Dhule Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघातात कुसुंब्यातील 6 जण जखमी

Accidental car on Samriddhi Highway.
Accidental car on Samriddhi Highway. esakal
Updated on

Dhule Accident News : महामार्गावरील बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर गावाजवळ अर्टिगा कारने चार पलट्या घेतल्याने कुसुंबा (ता. धुळे) येथील कुसुंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्यासह शाळेचे दोघे प्राचार्य व तीन कर्मचारी आश्चर्यकारक बालंबाल बचावले.

सर्व जण किरकोळ जखमी असून, ते रुग्णालयातून घरी आले आहेत. (6 people from Kusumba injured in an accident on Samriddhi Highway dhule accident news)

दैव बलवत्तर म्हणून सहाही जण मृत्यूला हुलकावणी देऊन मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आले आहेत. कुसुंबा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्यासह प्राचार्य के. डी. पाटील, प्राचार्य आर. व्ही. गढरी, उपशिक्षक रूपेश चौधरी, हर्शल शिंदे, कुणाल शिंदे रविवारी खासगी कामानिमित्त अर्टिगा (एमएट ४७, क्यू ७८२८) गाडीने नागपूरकडे जात होते.

बुलडाण्याजवळ समृद्धी महामार्गावर जात असताना मेहकर गावाजवळ चॅनल क्रमांक २७४ लगत गाडीने अचानक चार पलट्या घेतल्या. गाडी पूर्णतः डॅमेज झाली. एअर बॅग उघडल्याने चालक हर्शल शिंदे व अविनाश शिंदे सुखरूप बचावले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accidental car on Samriddhi Highway.
Dhule Accident News : Bus- Carअपघातात पती-पत्नी जखमी; कारची Air bag उघडल्याने अनर्थ टळला

श्री. शिंदेंसह प्राचार्य के. डी. पाटील, आर. व्ही. गढरी यांना बरगड्यांना मुका मार लागला असून, रूपेश चौधरी यांचा हात फ्रॅक्चर, तर कुणाल शिंदे यांच्या ओठाला लागले आहे. यात सहाही जण जखमी असून, खासगी रुग्णालयातून घरी परतले आहेत. गाडीची अवस्था बघितली असता त्यात कुणीही वाचले असावे असे वाटत नाही.

"काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, नशीब बलवत्तर म्हणून सर्व जण वाचलो. रात्री दोनला गाडीने अचानक चार पलट्या घेतल्या. गाडीतून आम्ही कसेबसे बाहेर निघालो. रस्त्यावरील एका ट्रकवाल्याने रुग्णवाहिका बोलविल्याने त्यांनी आम्हाला बाहेर काढले. चौधरी यांना गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले. वेळीच एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला." -प्रा. अविनाश शिंदे

Accidental car on Samriddhi Highway.
Accident: दिल्लीतील बड्या काँग्रेस नेत्याच्या पत्नीचे रस्ते अपघातात निधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.