धुळे : येथील महापालिकेतील ६२ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीचे पत्र प्रदान झाले. तसेच हद्दवाढीच्या गावातील ७२ कर्मचाऱ्यांचा कायम करण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला असून, त्यावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे यांनी आज दिली. (62 daily workers retained Appointment letter provided by Dhule Municipal Corporation dhule Latest marathi news)
महापौर कर्पे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त देविदास टेकाळे यांच्या हस्ते ६२ कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीचे पत्र प्रदान झाले.
मनपातील सत्ताधारी भाजपने कर्मचारी हिताचे निर्णय घेतले असून, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार गिरीश महाजन, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा भक्कम पाठिंबा आहे. त्यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांच्या माध्यमातून मनपा कर्मचाऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न
आहे. त्याची कर्मचाऱ्यांनीही जाणीव ठेऊन शहरासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा महापौर कर्पे यांनी व्यक्त केली.
तीस वर्षांपासून सेवेत
रोजंदारीतील ६२ कर्मचारी तत्कालीन नगरपालिका व आता महापालिकेत २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत होते. उच्च न्यायालयासह शासनाच्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, या कर्मचाऱ्यांची दीर्घ सेवा लक्षात घेता महापालिकेमार्फत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या माध्यमातून सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला होता. त्यानुसार कायम नियुक्तीबाबत प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर होता. याबाबत नुकतीच मान्यता प्राप्त झाल्याने त्यांना कायम नियुक्तीचा आदेश दिल्याची माहिती महापौर कर्पे, आयुक्त टेकाळे यांनी दिली.
कर्मचारी हिताचे निर्णय
महापालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ लागू करण्यात आला. तसेच ४१ सफाई कर्मचाऱ्यांना मनपाच्या कायम सेवेचा लाभ दिला. मनपा फंडातील ३९ कर्मचाऱ्यांना कायम पदावर समाविष्ट करण्यात आले.
फंडातील ११० कर्मचाऱ्यांना मंजूर पदावर समाविष्ट केले. रोजंदारीतील ६२ कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट केले. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचेही महापौरांनी सांगितले.
महापालिकेने तातडीने सकारात्मक निर्णय घेत केलेल्या कार्यवाहीबद्दल कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उपस्थिती कर्मचाऱ्यांकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सभागृह नेता राजेश पवार, विरोधी पक्ष नेते कमलेश देवरे, ज्येष्ठ नगरसेवक हिरामण गवळी, नगरसेवक वसीम मंत्री, राकेश कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त संगीता नांदूरकर, नगरसचिव मनोज वाघ, प्रभारी आस्थापना विभागप्रमुख संजय मोरे, कोर्ट लिपिक सुनील बर्ग, कामगार नेते दिलीप वाघ, श्री. मंगीडकर आदी उपस्थित होते.
भाजप कर्मचाऱ्यांच्या पाठीशी
श्री. अग्रवाल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सबका साथ- सबका विकास या माध्यमातून तळागळातील घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पक्ष कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. संबंधित रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याचा आनंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.