Dhule News : हद्दवाढ क्षेत्रातील 70 कर्मचारी मनपा सेवेत; नियुक्तीचे आदेश वितरित

employees in demarcation area in municipal service
employees in demarcation area in municipal serviceesakal
Updated on

Dhule News : महापालिका हद्दवाढ क्षेत्रातील तत्कालीन त्या-त्या ग्रामपंचायतींमधील सुमारे ७० कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या (Municipal Corporation) कायम सेवेत समाविष्ट करण्यात आले.

या कर्मचाऱ्यांना कायम सेवा नियुक्तीचे आदेश सोमवारी (ता. २०) वाटप करण्यात आले. (70 employees in municipal service in demarcation area Appointment orders distributed by dignitaries dhule news)

५ जानेवारी २०१८ ला धुळे महापालिकेची हद्दवाढ झाली. त्यानुसार वलवाडी, नकाणे, मोराणे, भोकर, महिंदळे, चितोड, वरखेडी, बाळापूर, पिंपरी, अवधान, नगाव (अंशतः) ही अकरा गावे धुळे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली.

या गावांतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मनपा आस्थापनेवर सामावून घेण्यासाठी धुळे महापालिकेने ठराव पारित करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला.

शासनाने डिसेंबर-२०२२ ला हा प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव मंजुरीसाठी खासदार डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, भाजपचे महानगरध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

या कर्मचाऱ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना कायम सेवा नियुक्तीचे आदेश सोमवारी महापालिका सभागृहात वाटप करण्यात आले.

खासदार डॉ. भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती किरणताई कुलेवार,

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

employees in demarcation area in municipal service
Dhule News : हद्दवाढीतील गावांच्या समस्या सोडवा; काँग्रेसचे मनपास निवेदन

महिला व बालकल्याण समिती उपसभापती विमल पाटील, माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले, नगरसेविका वंदना भामरे, नगरसेवक रंगनाथ ठाकरे, दगडू बागूल, किरण अहिरराव, रावसाहेब नांद्रे, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, विजय सनेर, आस्थापना विभागप्रमुख संजय मोरे, कोर्ट लिपिक सुनील बर्गे आदी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे

धुळे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर कर्मचारीहिताचे अनेक निर्णय घेतले. पक्षाचे नेते, पदाधिकारी, सर्व नगरसेवक-नगरसेविकांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

कर्मचाऱ्यांनीही याची जाणीव ठेवून शहरासाठी योगदान द्यावे, असे आवाहन महापौर श्रीमती चौधरी यांनी या वेळी केले.

कर्मचाऱ्यांची जबाबदारी आता वाढली असून, त्यांनी मनपाचे हित व सामान्य माणसाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करावे, असे श्री. अग्रवाल म्हणाले. दरम्यान, नियुक्ती आदेशप्राप्त कर्मचाऱ्यांकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

employees in demarcation area in municipal service
NMC News : नाशिककरांवरील पाणीपट्टी दरवाढ टळली! 27 फेब्रुवारीला सादर होणार अंदाजपत्रक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()