Dhule Crime : तांदळाच्या साळीत मद्यसाठा लपविला; एसटी कर्मचाऱ्यांची सतर्कता

Inspector Anand Kokre inspecting the liquor seized by the city police.
Inspector Anand Kokre inspecting the liquor seized by the city police. esakal
Updated on

Dhule Crime News : एसटी कंडक्टर, आगार व्यवस्थापकाच्या सतर्कतेनंतर तत्पर शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने बसमधून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडील २४ हजार किमतीच्या ७०० बाटल्या असलेल्या देशी दारूचा साठा जप्त केला. संशयिताने हा साठा तांदळाच्या साळी असलेल्या गोण्यांमध्ये लपविला होता. (700 bottles of country liquor worth 24000 seized from bus dhule crime)

येथील मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी (ता. १२) सकाळी सव्वादहाच्या सुमारास अमळनेर-बडोदा बसवरील (एमच २०, बीएल २५३४) वाहकाला एका प्रवाशासोबत चार गोण्यांमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्याचा संशय बळावला.

संशयिताकडून सुरत येथे त्या वस्तू नेल्या जात असल्याचे वाहकाला जाणवले. त्याने आगार व्यवस्थापकांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ बसस्थानकातील हवालदार ज्ञानेश्वर साळुंके व पोलिस नाईक वैभव वाडिले यांना ही माहिती दिली. त्यांनी पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना हा प्रकार कळविला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Inspector Anand Kokre inspecting the liquor seized by the city police.
Dhule Crime : रुग्ण दगावल्याच्या समजातून रुग्णालयामध्ये तोडफोड

पोलिस निरीक्षक कोकरे यांनी तत्काळ शोधपथकातील पोलिस नाईक कुंदन पटाईत, हवालदार महेश मोरे, मनीष सोनगिरे, अविनाश कराड, प्रवीण पाटील, गुणवंतराव पाटील, नीलेश पोतदार यांना चौकशीसाठी बसस्थानकात पाठविले.

अमळनेर-बडोदा बसमधील प्रवासी प्रवीण मोतीराम पाटील (रा. सुरत, गुजरात) याच्या ताब्यातील चार गोण्या तपासल्या असता त्यात तांदळाच्या साळीमध्ये देशी दारूच्या एकूण सातशे प्लॅस्टिकच्या सीलबंद बाटल्या आढळल्या. त्यामुळे प्रवासी पाटील यास ताब्यात घेत त्याच्याकडून २४ हजार ५०० किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

Inspector Anand Kokre inspecting the liquor seized by the city police.
Nandurbar News : अहो आश्चर्यम..! नंदुरबार-धुळे बसप्रवास चक्क 6 तासांचा....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()