Dhule News : जिल्ह्यातील दोन लाख २२ हजारांवर वीजग्राहकांकडे तब्बल ७६६ कोटी वीजबिल थकले आहे. विशेष म्हणजे यात जिल्ह्यातील विविध एक हजार २८० शासकीय कार्यालयांकडे सुमारे १४ कोटी ९७ लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे.
यात महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, बांधकाम, नगरविकास विभागाशी संलग्न कार्यालयांचा समावेश आहे. (766 crore electricity bill pending in district dhule news)
दरम्यान, १ ऑगस्टपासून ग्राहकांना पाच हजारांवरील वीज देयक ऑनलाइन भरण्याची सक्ती केल्याने थकबाकीचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. महावितरणच्या जळगाव परिमंडलाने ऑनलाइन वीजबिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा दावा केला आहे.
ऑनलाइन वीजबिल भरणाद्वारे सप्टेंबरमध्ये धुळे जिल्ह्यातील एक लाख सहा हजार ६७७ ग्राहकांकडून महावितरणला सुमारे २८ कोटी ५३ लाखांचा महसूल प्राप्त झाला ऑनलाइन ग्राहकांची ही संख्या लघुदाब वर्गवारीतील आहे.
दरम्यान, राज्य वीज नियामक आयोगाने १ ऑगस्टपासून लघुदाब व कृषी वर्गातील ग्राहक वगळता इतर ग्राहकांचे पाच हजार रुपयांहून अधिकचे देयक ऑनलाइन भरण्याची सक्ती केली. त्याचा फटका महावितरणला बसत आहे. राज्य वीज नियामक आयोगाने पाच हजारांवरील देयक रोखीने भरण्याची सक्ती केली आहे.
त्यामुळे महावितरणची थकबाकी वाढली आहे. वीजग्राहकांकडे स्मार्टफोन असेलच असे नाही. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे या ग्राहकांनी पाच हजारांवरील देयक ऑनलाइन भरायचे कसे, हा प्रश्न आहे. वीज देयक ग्राहकांच्या सोयीनुसारच भरण्याची मुभा असायला हवी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.
तब्बल ७६६ कोटी थकीत
जिल्ह्यातील एक लाख ९६६ कृषी ग्राहकांकडे ४८१ कोटी रुपये, एक लाख नऊ हजार ५४६ घरगुती ग्राहकांकडे २२ कोटी ७८ लाख रुपये वीजबिल थकले आहे. शिवाय एक हजार ५५८ औद्योगिक ग्राहकांकडे एक कोटी ८८ लाख, सात हजार ४६० वाणिज्य ग्राहकांकडे तीन कोटी ८५ लाख, सार्वजनिक दिवाबत्तींतर्गत एक हजार ३१२ ग्राहकांकडे एक कोटी २० लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे १३ कोटी कोटी ६० लाख तसेच इतर २०० व्यापारी व व्यावसायिकांकडे सात लाख आदींसह सुमारे दोन लाख २२ हजार ६२० ग्राहकांकडे ७६६ कोटी रुपये वीजबिल थकीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.