Dhule Crime News : सराईत चोराला बेड्या; 9 दुचाकी हस्तगत

District Superintendent of Police Sanjay Barkund, Additional Superintendent of Police Kishore Kale, Inspector of Police Hemant Patil and a team along with the two-wheeler thief in the inn and the two-wheelers seized from him.
District Superintendent of Police Sanjay Barkund, Additional Superintendent of Police Kishore Kale, Inspector of Police Hemant Patil and a team along with the two-wheeler thief in the inn and the two-wheelers seized from him.esakal
Updated on

Dhule Crime News : दुचाकी चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सराईत चोरट्याला जेरबंद करत त्याच्या घरासह मित्राच्या घरातून साडेतीन लाखांच्या नऊ दुचाकी हस्तगत केल्या. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाला दहा हजारांचा रिवार्ड जाहीर केला.(9 bike theft police arrest accused dhule crime news )

धुळे शहरातील देवपूर भागातील रवींद्र शिंपी (रा. प्रियदर्शनीनगर, नगावबारी परिसर) यांची दुचाकी (एमएच-१८/ओटी-८२८०) २५ सप्टेंबरला रात्री साडेआठ ते सव्वानऊदरम्यान शहरातील मोठ्या पुलाजवळील नारायणदास बुवा समाधी मंदिरासमोरून चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी १६ ऑक्टोबरला रवींद्र शिंपी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शहरातील दुचाकी चोरीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक श्री. बारकुंड यांनी ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांना चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांनी तपासाला गती दिली. यादरम्यान प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने दौलत किसन चव्हाण (रा. छत्रपती शिवाजीनगर, वडजाई ता. धुळे) याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने घराजवळून पाच दुचाकी काढून दिल्या. अधिक तपासानंतर पाच दाखल गुन्हे उघडकीस आले. दौलत चव्हाण याच्याकडे अधिकची विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र पंकज सुभाष नलावडे (रा. राजगुरू नगर, धुळे) याच्या घरी चोरीच्या दुचाकी असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने नलावडे याच्या घरी तपासणी केली. तेथे पंकज मिळून आला नाही. मात्र, त्याच्या घराजवळ चार दुचाकी मिळून आल्या.

District Superintendent of Police Sanjay Barkund, Additional Superintendent of Police Kishore Kale, Inspector of Police Hemant Patil and a team along with the two-wheeler thief in the inn and the two-wheelers seized from him.
Dhule Crime News : आमळथे येथे 3 लाखांची चोरी

यात पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दाखल दोन गुन्हे उघडकीस आले. चोरट्याकडून तीन लाख ५० हजार रुपये किमतीच्या एकूण नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. पथकाने संशयिताला बेड्या ठोकल्या. या कारवाईतून शहरातील दुचाकी चोरीचे सहा दाखल गुन्हे उघडकीस आले. अन्य तीन गुन्ह्यांच्या तपासाचे काम सुरू आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्री. पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजित मोरे, संजय पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

District Superintendent of Police Sanjay Barkund, Additional Superintendent of Police Kishore Kale, Inspector of Police Hemant Patil and a team along with the two-wheeler thief in the inn and the two-wheelers seized from him.
Dhule Crime News : शेतकरी कुटुंब शेतात गेले अन... सव्वा लाखाचा ऐवज लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.