Dhule News : धुळ्यातील हेमंत पाटलांसह 9 जणांना सन्मानचिन्ह

District Police Force
District Police Force esakal
Updated on

Dhule News : येथील पोलिस दलाच्या कारकिर्दीत कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यासह नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. २६) पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले. उत्कृष्ट सेवा, अभिलेखाबद्दल पोलिस महासंचालकांकडून हा गौरव करण्यात आला आहे. (9 persons including Hemant Patil were announced with badges and certificates of appreciation from Director General of Police dhule news)

पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर करणारी राज्याची विशेष यादी बुधवारी जाहीर झाली. तीत राज्यातून आठशे जणांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले. त्यात धुळे जिल्ह्यातील नऊ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यासह चौघे एलसीबीचे सन्मानार्थी आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

District Police Force
Market Committee Election : बाजार समितीच्या मैदानात लोकसभा, विधानसभेची पेरणी; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

धुळे जिल्ह्यातून एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार प्रभाकर पाटील, एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक योगेश सीताराम राऊत, हवालदार संदीप धनाजी सरग, प्रकाश रणछोड सोनार, जिजाप्रपसचे पोलिस अधीक्षक राजकुमार शंकर शिंदे, राज्य राखीव दल बल गट क्रमांक सहाचे समादेशक सदाशिव येलचंद पाटील, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे निरीक्षक रामकृष्ण नारायण पाटील, हवालदार रवींद्र वसंत गायकवाड, मोटार परिवहनचे हवालदार जाकिरखाँ नवाजखाँ पठाण यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्राने गौरविले आहे.

District Police Force
Nandurbar News : शेतकऱ्यांच्या खर्चातून रस्त्याचे काम; प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.