Dhule Ganesh Visarjan: हत्तीडोहात 9 हजार गणेशमूर्ती विसर्जित; 5 टन निर्माल्यातून कंपोस्ट खतनिर्मिती

Pratibha Chaudhary, along with Vijay Saner, Rajesh Vasave, Chandrakant Jadhav, Vikas Salve etc. while inspecting cleanliness on Agra Road
Pratibha Chaudhary, along with Vijay Saner, Rajesh Vasave, Chandrakant Jadhav, Vikas Salve etc. while inspecting cleanliness on Agra Roadesakal
Updated on

Dhule Ganesh Visarjan : गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने पांझरा नदीकाठी विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांवर गुरुवारी (ता. २८) श्री गणेशमूर्तींचे संकलन केले.

या सर्व संकलित गणेशमूर्ती नंतर हत्तीडोह येथे विसर्जित करण्यात आल्या. सुमारे नऊ हजार गणेशमूर्तींचे महापालिकेकडून संकलन व विसर्जन झाले. शिवाय साडेचार-पाच टन निर्माल्यही महापालिकेने जमा केले.

महापालिकेसह विविध संस्था-संघटनांकडून गुरुवारी दुपारी चारनंतर विसर्जन मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. महापालिकेने पांझरा नदी काठी नऊ ते दहा ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली होती.

याठिकाणी कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मनपा कर्मचाऱ्यांनी गणेशमूर्ती व निर्माल्य संकलित केले. प्रत्येक ठिकाणी ८०० ते ९०० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

नंतर कर्मचाऱ्यांनी मूर्ती संकलित करून वाहनातून हत्तीडोह येथे नेल्या व तेथे मूर्तींचे विसर्जन केले. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन हत्तीडोहात झाले. यंत्रणेने एकूण ९०० गणेशमूर्तींचे संकलन व विसर्जन केले.

Pratibha Chaudhary, along with Vijay Saner, Rajesh Vasave, Chandrakant Jadhav, Vikas Salve etc. while inspecting cleanliness on Agra Road
Ganesh Visarjan: पुण्यातील मिरवणूक अखेर संपली; गेल्यावर्षीच्या तुलनेत अडीच तास लवकर सांगता

पाच टन निर्माल्य

कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी निर्माल्यही संकलित केले. सरासरी साडेचार ते पाच टन निर्माल्य संकलित झाल्याचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. यंदा तुलनेने कमी निर्माल्य संकलित झाल्याचेही ते म्हणाले.

यंत्रणेने संकलित केलेल्या निर्माल्याचा वापर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी होणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेतर्फे सुमारे पावणेतीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती. रात्री दोनपर्यंत शेवटची गणेशमूर्ती विसर्जित झाली.

तोपर्यंत कर्मचारी हजर होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत महापौर, आयुक्तांनी उपस्थित राहून आरोग्य व बांधकाम विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवले.

मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, चंद्रकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, शुभम केदार, प्रमोद चव्हाण, मुकादम अनिल जावडेकर, कैलास पाटील, रवींद्र धुमाळ, चंद्रकांत सोनार, इजाज शेख, सुपरवायझर नरेश वानखेडे उपस्थित होते.

Pratibha Chaudhary, along with Vijay Saner, Rajesh Vasave, Chandrakant Jadhav, Vikas Salve etc. while inspecting cleanliness on Agra Road
Ganesh Visarjan 2023: देवनदी खोरे भागात गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.