धुळे : मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेकडून कारवाई सुरू असली तरी कारवाई झालेल्या थकबाकीदारांशिवाय इतर थकबाकीदार धाकाने कर भरण्यास पुढे येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (abhay yojana after giving 100 percent shasti mafi dues of crores of rupees are yet to be recovered from arrears dhule news)
‘कारवाई झाली तर बघू...’ अशी ही स्थिती आहे. त्यामुळे शंभर टक्के शास्ती माफी देऊन व मार्चअखेर आल्यानंतरही कोट्यवधी रुपये थकबाकी वसूल होणे बाकी आहे. विशेष म्हणजे मोबाईल टॉवर्स कंपन्याही निम्मी रक्कम अदा करून तूर्त सुटका करून घेत आहेत.
मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शास्ती माफी योजना लागू केली आहे. तसेच कारवाईदेखील करण्यात येत आहे. ६ फेब्रुवारीपासून सुरू झालेली शंभर टक्के शास्ती माफीची योजना ३१ मार्चपर्यंत आहे.
या शास्तीमाफी योजनेचा अनेक थकबाकीदारांनी लाभ घेतला खरा पण अद्यापही इतर अनेक थकबाकीदार दाद देत नसल्याचे चित्र आहे. मालमत्ता कर विभागाकडून कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. गेल्या काही दिवसातील कारवाईदरम्यान पथकांनी मोबाईल टॉवरदेखील सील केले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
१८ टॉवर सील पण...
महापालिकेच्या कारवाई पथकाने शहरातील विविध कंपन्यांचे आत्तापर्यंत १८ मोबाईल टॉवर सील केले. कारवाईनंतर मात्र, संबंधित कंपन्यांनी निम्मे थकबाकी भरून सुटका करून घेतली आहे. संबंधित कंपन्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने या कंपन्या शंभर टक्के कर भरत नसल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे ५० टक्के रक्कम अदा झालेल्या कंपन्यांचे टॉवर कारवाई पथकाला उघडून देणे भाग पडत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात आणखी काही टॉवर्स सील करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात कागदोपत्री १३९ टॉवर्स असून संबंधित कंपन्यांकडे तीन ते साडेतीन कोटी थकबाकी आहे. त्यापैकी सुमारे एक कोटी रुपये वसूल झाली आहे.
२७ दुकानदारांनी भरले पैसे
थकबाकीदार मोबाईल टॉवर कंपन्यांबरोबरच काही गाळेधारक, दुकानदारांवरही महापालिकेच्या पथकाकडून कारवाई झाली. यात आत्तापर्यंत एकूण ३५ दुकाने पथकांनी सील केली होती. यातील २६-२७ थकबाकीदारांनी पैसे भरले. उर्वरित काही प्रकरणांमध्ये डिस्प्युट असल्याचे सांगितले जाते.
मार्चअखेर आला तरी...
मार्चअखेर आल्यानंतर कर भरणाऱ्यांच्या महापालिकेत रांगा लागतात. सध्या शंभर टक्के शास्ती माफी योजना सुरू असताना अपेक्षित कर वसुली मात्र होत नसल्याचे दिसते. मंगळवारी (ता.२८) एकूण २४८ मालमत्ताधारकांनी कर अदा केला. यातून महापालिकेच्या तिजोरीत एकूण १६ लाख ४८ हजार रुपये जमा झाले. यात संबंधितांची सात लाख ५१ हजार रुपये शास्ती माफ झाली.
वसुलीची स्थिती अशी
मूळ मागणी...५८ कोटी
शास्तीसह मागणी...८५ कोटी
आत्तापर्यंत वसुली...३५ कोटी
शास्तीसह येणे....५० कोटी
शास्तीशिवाय येणे...२३ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.