Dhule Crime: आप्तस्वकीयांकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 3 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

abuse of minor girl by relatives dhule crime news
abuse of minor girl by relatives dhule crime news
Updated on

Dhule Crime: अल्पवयीन मुलींवर साक्री व शिरपूर येथे अत्याचार केल्याच्या संशयावरून तीन संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या दिवशी दोनदा अत्याचार केल्यानंतर संशयितांनी मुलींना पळवून नेण्याचाही प्रयत्न केला.

संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रात्रीच रवाना झाले. पीडित मुली एकमेकांच्या नातलग असून, एकाच वस्तीत राहतात. संशयित त्यांचे नातलग असल्याचे कळते. (abuse of minor girl by relatives dhule crime news)

पीडित मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ३० ऑगस्टला इंधवेहट्टी (ता. साक्री) येथे देवाची जत्रा असल्याने मुलगी व तिची आतेबहीण तेथे गेले होते. आतेबहिणीचा चुलतभाऊ दादा बाळू ठेलारी व तानू बापू ठेलारी (दोघे रा. सतारे, ता. शिंदखेडा) हेदेखील जत्रेत गेले होते.

रात्री पीडित मुली दुसाने (ता. साक्री) येथेच थांबल्या. रात्री अकराला संशयितांनी दोघींना आइस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने उठवले. त्यानंतर दमदाटी करून दोघींना जंगलात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. त्याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी (ता. १५) मुलींच्या गावाजवळ देवाच्या कार्यक्रमासाठी सर्व मंडळी गेली होती. पीडित मुली व त्यांच्यासोबत अन्य एक नातलग मुलगी अशा तिन्ही घरी होत्या. रात्री बाराला संशयित दादू ठेलारी, तानू ठेलारी व भटू तांबे (सर्व रा. सतारे) दुचाकीने त्यांच्या वस्तीत पोचले.

abuse of minor girl by relatives dhule crime news
Nashik Crime: गुन्हे दाखल डीजेंची होणार जप्ती! सहायक आयुक्तांकडे चौकशी; ‘जुलूस’मध्येही वाजला डीजे

त्यांनी तिन्ही मुलींवर अत्याचार केला. त्यांना धमकी देऊन संशयित मध्यरात्री निघून गेले. १६ सप्टेंबरला तिन्ही मुली शेतात जात असताना संशयितांनी तिघींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापैकी एकीने स्वत:ची सुटका करून आरोळ्या ठोकल्याने त्यांना तिथेच सोडून संशयित फरारी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सतारे येथे मारहाण

या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी समाजातील वरिष्ठांना घेऊन मुलींचे पालक सतारे येथे गेले असता, त्यांना संशयितांनी मारहाण केली. त्यांच्या वाहनाचे टायर फोडले.

जीव बचावून संबंधितांना घराकडे पळ काढावा लागला, अशी माहिती त्यांनी दिली. तेथील जमावाने सतारे येथील माजी सरपंचाने चिथावणी दिल्याची माहिती मुलीच्या पालकांनी दिली.

शिवसेनेकडून दखल

या घटनेची माहिती मिळताच धुळे येथील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख हेमलता हेमाडे, उपमहानगरप्रमुख प्रतिभा सोनवणे, विभागप्रमुख संगीता भागवत, कुंदा मराठे, बापू ढेकळे, धनराज सरगर यांनी शिरपूर शहर पोलिस ठाणे गाठले.

पोलिसांशी चर्चा करून त्यांनी घटनेची माहिती देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. येथील पोलिस ठाण्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत, ज्येष्ठ नेते राजू टेलर यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

abuse of minor girl by relatives dhule crime news
Nashik Crime : दिल्लीच्या बेपत्ता विवाहितेचा गंगापूर धरणात आढळला मृतदेह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.