Dhule Bribe Crime : लाचखोर सल्लागार अभियंता जाळ्यात; 25 हजार भोवले

acb caught consultant engineer while accepting bribe dhule bribe crime
acb caught consultant engineer while accepting bribe dhule bribe crime esakal
Updated on

Dhule Bribe Crime : अवधान एमआयडीसीतील भूखंडावर अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी नकाशा मंजुरीकामी २५ हजारांची लाच घेताना सल्लागार अभियंत्याला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. अहमद वफा अहमद हसन अन्सारी असे लाचखोराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

तक्रारदाराने अवधान एमआयडीसीत भूखंडावर अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी नकाशा मंजुरीकामी ७ जूनला कार्यकारी अभियंता (एमआयडीसी, अवधान) यांच्या कार्यालयात रीतसर ऑनलाइन अर्ज केला होता. (acb caught consultant engineer while accepting bribe dhule bribe crime )

त्याकरिता लागणारे आवश्यक चलनदेखील भरले होते. बराच कालावधी उलटूनसुद्धा अतिरिक्त बांधकामाचा नकाशा मंजूर न झाल्याने तक्रारदार बुधवारी (ता. ६) कार्यकारी अभियंता (एमआयडीसी, अवधान) यांच्या कार्यालयात तक्रारदार गेले असता सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी याने त्याची एमआयडीसी कार्यालयात ओळख असल्याचे सांगून कार्यालयातून बांधकाम मंजुरीचे काम करून देण्यासाठी २५ हजारांची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून घडलेला वृत्तान्त कथन केला. त्यावर एसीबीने तक्रारीची शहानिशा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

acb caught consultant engineer while accepting bribe dhule bribe crime
Dhule Bribe Crime : कृषी विस्तार अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

सल्लागार अभियंता अहमद वफा अहमद हसन अन्सारी याला कार्यालयाजवळ रक्कम देण्याची हमी दिल्यानंतर एसीबीने सापळा रचून अहमद वफा अहमद हसन अन्सारी यास लाच स्वीकारताना पकडले.

नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घाटगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस अधीक्षक (वाचक) नरेंद्र पवार, विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मंजितसिंग चव्हाण, रूपाली खांडवी, राजन कदम, शरद काटके, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

acb caught consultant engineer while accepting bribe dhule bribe crime
Dhule Bribe Crime : लाचखोर तलाठी, कोतवालासह तिघांविरूध्द निजामपूरला गुन्हा; शेतीची खातेफोड अंगलट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.