Dhule News : धुळ्यात डे केअर सेंटरला मान्यता; हिमोफिलिया रुग्णांना दिलासा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराबाबत धुळ्यासह राज्यातील एकूण २७ जिल्ह्यात डे केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.
Sachin Shevatkar
Sachin Shevatkaresakal
Updated on

Dhule News : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराबाबत धुळ्यासह राज्यातील एकूण २७ जिल्ह्यात डे केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून हिमोफिलिया सोसायटी लढा देत होती.

या विषयाचे गांभीर्य ओळखून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शेवतकर यांनी योग्य तो पाठपुरावा केल्याने सेंटरला मान्यता मिळाली. त्यामुळे हिमोफिलिया रुग्णांना दिलासा मिळाला आहे. (Accreditation of Day Care Center in Dhule for hemophilia patients news)

हिमोफिलिया हा आनुवंशिक आजार असून, यात रुग्णांमध्ये फॅक्टर ८ व ९ ची कमतरता असते. अशा रुग्णांच्या शरीरात कुठेही जखम झाल्यास त्यांचा रक्तस्राव थांबत नाही. त्यासाठी त्यांना तातडीने इंजेक्शन द्यावे लागते; परंतु ही सुविधा केवळ मुंबई व पुणे, अशा महानगरांमध्येच आहे.

धुळ्यासह खानदेशातील रुग्णांना या सेवा-सुविधेसाठी नाशिकला जावे लागते. त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय आणि परिणामी अपंगत्व किंवा जीव जाण्याचा धोका होता. ही सुविधा धुळ्यात उपलब्ध होण्यासाठी हिमोफिलिया सोसायटी स्थापन झाली.

अध्यक्ष निकुंभ, सचिव स्वप्नील पाटील, खजिनदार दीपक काळे व इतर सहकारी नऊ वर्षांपासून लढा देत होते.

Sachin Shevatkar
Dhule Municipality News : धुळ्यात 4 दुकाने सील; मनपाच्या जप्ती पथकाची करवसुलीप्रश्‍नी कारवाई

त्यांनी जानेवारीअखेर श्री. शेवतकर यांच्याकडे ही समस्या मांडली. या संदर्भात दोन दिवसांत कागदपत्रांची जुळवाजुळव करीत श्री. शेवतकर यांनी मुंबईतील आरोग्य भवन गाठले.

तेथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहाय्यक संचालक डॉ. विजय बाविस्कर तसेच अतिरिक्त संचालकांशी चर्चा करून डे केअर सेंटरची गरज व्यक्त केली. ६ फेब्रुवारीला श्री. शेवतकर यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन दिले.

असे असताना ९ फेब्रुवारीला डॉ. बाविस्कर यांनी धुळ्यात डे केअर सेंटर सुरू करण्याचा आदेश पारित केला. या पाठपुराव्याबद्दल फिमोफिलियाच्या रुग्णांनी श्री. शेवतकर यांचे आभार मानले.

Sachin Shevatkar
Dhule News : जिल्ह्यात पर्यवेक्षकांची अदलाबदली; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय बदलण्यासाठी गळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()