Dhule News : जन्म-मृत्यूच्या संघर्षात आईचा पुनर्जन्म; जवाहर मेडिकल रुग्णालयात डॉक्टरांकडून जीवदान

The medical team at Jawahar Foundation Hospital who resuscitate the newborn baby along with the mother.
The medical team at Jawahar Foundation Hospital who resuscitate the newborn baby along with the mother. esakal
Updated on

Dhule News : येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज आणि संलग्न रुग्णालयात स्त्रीरोग विभागातील वैद्यकीय पथकाचा उपचारावेळी रुग्णास मायेचा ओलावा मिळाला.

योग्य उपचारामुळे जन्माआधीच मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या नवजात बालकासह मातेस जीवदान देण्यासाठी वैद्यकीय पथकाने प्रयत्नांची यशस्वी पराकाष्टा केली. (ACPM Medical College of Jawahar Medical Foundation save pregnant mother with baby dhule news)

त्यामुळे नवजात बालकासह माता सुखरूप आहे. प्रसूतीनंतर आईला दुसरा जन्म मिळत असल्याचे म्हटले जाते. मात्र, काही वेळेस प्रसूती जीवघेणी ठरत असल्याची उदाहरणे घडतात.

यात मृत्यूच्या दाढेतून माता आणि नवजात बालकास जीवदान देण्यासाठी मोराणे शिवारातील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाने प्रयत्नांची यशस्वी शिकस्त केली.

एका गर्भवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नऊ महिने पूर्ण झाल्यावर संबंधित मातेची प्रकृती बिघडली. तिला जवाहर मेडिकलच्या रुग्णालयात नेताना वाटेत प्रसूतिकळा सुरू झाल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The medical team at Jawahar Foundation Hospital who resuscitate the newborn baby along with the mother.
Dhule News : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या गेटला फळा टांगून भरली शाळा

वाटेतच नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे शस्त्रक्रियेवेळी निष्पन्न झाले. त्या वेळी मातेच्या उदरात दुसरा गर्भ असल्याचे दिसून झाले. तत्काळ शस्त्रक्रिया केल्याने दुसऱ्या बाळाचा सुखरूपपणे जन्म झाला.

माता आणि नवजात बालकाच्या जीवनमरणाच्या संघर्षात त्यांना फाउंडेशनचे डॉ. नितीन कुलकर्णी, डॉ. अमोल कोरान्ने, डॉ. शोधन गोंधकर, डॉ. सुमन बलानी, डॉ. प्रियांका, डॉ. आकांक्षा, डॉ. हर्षाली, बालरोगतज्ज्ञ डॉ. देवीदास घनाटे, डॉ. दीपक चौधरी, भूलतज्ज्ञ डॉ. मनोज कोल्हे, डॉ. मानसी पानट, डॉ. गद्रे, डॉ. कुंवर आदींनी जीवनदान दिले.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार कुणाल पाटील, सचिव डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. आर. व्ही. पाटील, डॉ. मधुकर पवार यांनी समाधान व्यक्त केले. नातेवाइकांनी डॉक्टरांचे आभार मानले.

The medical team at Jawahar Foundation Hospital who resuscitate the newborn baby along with the mother.
Dhule News : दुसऱ्यानेच काढला परस्पर पीकविमा! अजंगच्या शेतकऱ्याची तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.