Nandurbar Milk Aduteration Crime : शहादा तालुक्यात दूधभेसळीविरोधात धडक कारवाई; डेअरीचालकावर गुन्हा दाखल

Team taking samples of milk at dairy
Team taking samples of milk at dairyesakal
Updated on

Nandurbar Milk Aduteration : तालुक्यात दूधभेसळीविरोधात दूध भेसळ नियंत्रण समितीच्या पथकाने धडक कारवाई करत शहरासह ग्रामीण भागातील विविध दूध केंद्रांची तपासणी करून विक्रेत्यांकडून दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या वेळी अन्न परवाना नसलेल्या डेअरीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात दूधभेसळीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक तक्रारी जिल्हा नियंत्रण समितीकडे प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा नियंत्रण समिती आणि अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिस दलातर्फे नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाईचे सत्र सुरू आहे. (Action against milk adulteration in Shahada taluka nandurbar News)

बुधवारी (ता. १३) शहादा तालुक्यातील खासगी डेअरी, तसेच खासगी दूध विक्रेत्यांच्या दुकानांची अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे, नंदुरबारचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न व सुरक्षा अधिकारी आ. भा. पवार, पशुधन विकास अधिकारी मसू तळेकर, वैधमापनशास्त्र निरीक्षक भूषण हारोडे, धुळे येथील जिल्हा दूध विकास अधिकारी कार्यालयाचे विस्तार संकलक प्रीतेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, तंत्रज्ञ मच्छिंद्र चव्हाण, शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने तपासणी केली.

पथकाने अनेक ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, तर एका डेअरीचालकाकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याने त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर एका विक्रेत्याकडे मापे वैध नसल्याने वैधमापन विभागानेही संबंधितावर कारवाई केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Team taking samples of milk at dairy
Nandurbar News : पोळ्याआधीच बैलाच्या मृत्यूने सारेच गहिवरले! मोड येथील शेतकऱ्यावर दुःख ओढवले

नागरिकांकडून कारवाईचे स्वागत

जिल्ह्यात अचानक दूध विक्रेत्यांविरोधात सुरू झालेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. पुढेही जिल्हाभरात ही कारवाई अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

"दुधाचे नमुने एफडीएच्या लॅबमध्ये पाठविण्यासाठी घेण्यात आले आहेत. नमुन्यांच्या अहवाल आल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून कारवाई होईल. दुधामध्ये पाणी किंवा इतर घटक, रसायन काहीही भेसळ करू नये.

दुधामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ न करता योग्य पद्धतीने दुधाचे वितरण करण्यात यावे. भविष्यात दुधामध्ये भेसळ आहे, अशी शंका कोणाला आल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा दूध नियंत्रण समिती, दुग्धविकास अधिकारी यांना माहिती देण्यात यावी." -डॉ. अमित पाटील, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, धुळे-नंदुरबार

Team taking samples of milk at dairy
Nandurbar News : याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.