Dhule Crime News: विनापरवाना कापूस खरेदी करणाऱ्यांवर कारवाई; साक्री बाजार समितीच्या भरारी पथकाचा दणका

Police personnel along with Bharari Squad Secretary Bhushan Bachhao while impounding the vehicle of a trader who bought illegal cotton.
Police personnel along with Bharari Squad Secretary Bhushan Bachhao while impounding the vehicle of a trader who bought illegal cotton.esakal
Updated on

Dhule Crime News : तालुक्यात विनापरवाना बेकायदा कापूस खरेदी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील कापूस व्यापाऱ्यांवर येथील बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई करत त्यांचे वाहन ताब्यात घेतले.

बाजार समिती भरारी पथकाच्या या धडक कारवाईने बेकायदा कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.( Action against unlicensed cotton buyers dhule crime news)

साक्री तालुक्यात अनेक बाहेरजिल्ह्यातील व्यापारी कापूस खरेदीसाठी येतात. मात्र ही खरेदी कुठल्याही प्रकारचा परवाना न घेता बेकायदा सुरू असल्याने याचा बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होत असतो. तसेच अनेक वेळा शेतकऱ्यांचे पैसे बुडविण्याचेदेखील प्रकार यातून घडत असल्याने शेतकऱ्यांचीदेखील फसवणूक होते.

यावर आळा घालण्यासाठी बाजार समितीतर्फे भरारी पथक नेमत सध्या धडक कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने गेल्या आठवड्यातदेखील कारवाई करण्यात आली होती, तर बुधवारी दुसाने येथे बेकायदा कापूस खरेदी करणाऱ्या धरणगाव येथील श्रीजी जिनिंग व एरंडोल येथील श्री कृपा जिनर्स यांचे वाहन या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली. ही कारवाई बाजार समितीचे सचिव भूषण बच्छाव, संदीप अहिरराव, पथकासमवेत निजामपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमान गायकवाड, के. एफ. शेख, एस. एन. पदमोर यांनी केली.

Police personnel along with Bharari Squad Secretary Bhushan Bachhao while impounding the vehicle of a trader who bought illegal cotton.
Dhule Crime News : शिंदखेडा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध उत्खनन; महसूलच्या काहींच्या ‘मिलीभगत’चा आरोप

बेकायदा खरेदी करू नका ः बाजार समिती

कारवाईच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रसिद्धी पत्रक काढून व्यापाऱ्यांना बेकायदा खरेदी न करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. नियंत्रित शेतमालाची बेकायदा खरेदी-विक्री होत असल्याने हे कृत्य बाजार समितीच्या कायद्याचे उल्लंघन करणारे आहे, म्हणून जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या सभेत बाजार समिती व सरकारी कामगार अधिकारी तथा माथाडी बोर्ड सचिव यांनी एकत्र येऊन भरारी पथक नेमत खासगी बेकायदा व्यवहारांवर, शेतबांधावर, खासगी पथारी व इतर ठिकाणी होणाऱ्या विनापरवाना व बेकायदा खासगी व्यवहारावर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

या अनुषंगाने व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर बांधावर, खासगी पथारी व इतर ठिकाणी शेतमालाचे खरेदी-विक्रीचे खासगी व्यवहार करू नये, अन्यथा संबंधितांवर कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम व उपविधीतील तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बाजार समितीचे सभापती बन्सीलाल बाविस्कर, उपसभापती भानुदास गांगुर्डे, संचालक मंडळ, प्रभारी सचिव भूषण बच्छाव आदींनी सांगितले.

Police personnel along with Bharari Squad Secretary Bhushan Bachhao while impounding the vehicle of a trader who bought illegal cotton.
Dhule Crime News : शिरपूर तालुक्यात 1 कोटीचा गांजा जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.