Dhule News : इंदूरकडून (मध्य प्रदेश) पुण्याकडे जाणारा राज्यात प्रतिबंधित गुटख्याचा आयशरसह ४३ लाखांचा माल एलसीबीने नरडाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त केला. या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
राज्यात प्रतिबंधित गुटख्याची परराज्यातून वाहतूक होत असते. अशी गैरवाहतूक रोखण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिले आहेत.
याआधारे एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी कारवाईतून ४३ लाखांचा गुटखा जप्त केला. (Action of MCB Stock in Eicher going from Indore to Pune Gutkha worth 43 lakh seized from highway Dhule News)
इंदूरकडून आयशर (एमएच १८, बीजी ३३०९) पुण्याकडे जात होता. त्यातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीच्या पथकाने नरडाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल अन्नपूर्णाजवळ सापळा रचला.
संशयित आयशर धुळ्याच्या दिशेने येत असताना तो पोलिस पथकाने रोखला. ट्रकचालक आणि सहचालकाची चौकशी सुरू केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सदाशिव रामचंद्र राठोड (वय ३५) आणि सिकंदर कैलास सोनगरा (वय ४५, दोघे रा. महू, जि. इंदूर) याने ट्रकमधील मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे एलसीबी पथकाच्या तपासणीत पंधरा लाखांच्या आयशरसह विविध प्रकारचा मिळून ४३ लाख ६७ हजार ११८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई श्री. बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, कमलेश सूर्यवशी, प्रशांत चौधरी, राहुल गिरी, मयूर पाटील, तुषार पारधी, योगेश साळवे यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.