On Tuesday, a team of Additional Tehsildars took action against those illegally filling gas cylinders in the city's Parola Road area and confiscated the cylinders along with the goods.
On Tuesday, a team of Additional Tehsildars took action against those illegally filling gas cylinders in the city's Parola Road area and confiscated the cylinders along with the goods.esakal

Dhule Crime News : अवैध गॅस सिलिंडरसह मुद्देमाल जप्त; अपर तहसीलदारांच्या पथकाची कारवाई

Published on

Dhule Crime News : अवैधरीत्या वाहनात घरगुती गॅस भरण्याप्रकरणी मंगळवारी (ता. ३१) दुपारी शहरातील पारोळा रोडवर अपर तहसीलदारांच्या पथकाने कारवाई केली.

या कारवाईत सहा सिलिंडरसह वजनकाटा, इलेक्ट्रिक मोटारपंप जप्त करण्यात आले.(action of seized illegal gas cylinder dhule crime news)

शहरातील पारोळा रोडवरील पेट्रोलपंपनजीक अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडर वाहनात भरत असल्याची गुप्त माहिती अपर तहसीलदार विनोद पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक सोबत घेऊन छापा टाकला.

घटनास्थळी साकीर पिंजारी अवैधरीत्या सहा गॅस सिलिंडर भरताना आढळला. पथकाने सिलिंडरसह इलेक्ट्रिक गॅसपंप, वजनकाटा आदी मुद्देमाल जप्त केला. मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी मायानंद भामरे यांच्या ताब्यात देण्यात आला.

On Tuesday, a team of Additional Tehsildars took action against those illegally filling gas cylinders in the city's Parola Road area and confiscated the cylinders along with the goods.
Dhule Crime News : अपघाताचे कारण देत ऑइल विक्री; टँकरचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

तहसीलदार पाटील, मंडळ अधिकारी सागर नेमाने, कमलेश बाविस्कर, गौणखनिज महसूल सहाय्यक नाना गवळी, मनोहर पाटील, नीलेश सांगळे आदींनी ही कारवाई केली. यापूर्वीच्या कारवाईत पथकाने अवैध १९ सिलिंडर जप्त केले होते.

दरम्यान, शहरात अवैधरीत्या गॅस सिलिंडर भरताना कुणी आढळल्यास नागरिकांनी तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन अपर तहसीलदार पाटील यांनी केले आहे.

On Tuesday, a team of Additional Tehsildars took action against those illegally filling gas cylinders in the city's Parola Road area and confiscated the cylinders along with the goods.
Dhule Crime News : एलसीबीकडून गावठी कट्टा जप्त; संशयित तरुणाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.