Dhule Crime News : बुलेटचा कर्कश आवाज करणाऱ्या 15 जणांवर कारवाई; नागरिकांकडून समाधान

Youth removing the silencer of the action bullet.
Youth removing the silencer of the action bullet.esakal
Updated on

Dhule Crime News : कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाद्वारे शहरवासीयांना त्रस्त करून सोडणाऱ्या बुलेटस्वारांना शहर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर व सहकाऱ्यांनी विशेष मोहीम उघडून बुलेटस्वारांवर कारवाई केली असून, आजअखेर सुमारे १५ बुलेटस्वारांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यातच मेकॅनिकद्वारे सायलेन्सर बदलण्याचे काम सुरू आहे.(Action taken against 15 people who made sound of bullets dhule crime news)

दुचाकीच्या स्ट्रोक्सचा आवाज नियंत्रणात आणण्यासाठी सायलेन्सरचा वापर केला जातो. येथे मात्र सायलेन्सरची व्याख्याच काही बुलेटस्वारांनी बदलून टाकली आहे. कर्कश आवाज करणारी यंत्रणा असलेल्या विशिष्ट सायलेन्सरचा वापर करून बुलेटस्वार रस्त्यांवर रात्री-बेरात्री फिरत असतात.

फटाके फुटल्यासारखे आवाज करीत असल्याने या बुलेटला ‘फटाका बुलेट’ असेही म्हटले जाते. युवती, विद्यार्थिनींमागे फिरणारे रोडरोमिओ, टवाळखोर, मद्यपी युवक, अकारण प्रचंड वेगाने बुलेट पळविणारे हौशी तरुण यांचा मोठा उपद्रव शहरात आहे.

रात्री-बेरात्री शहरातील कॉलनी परिसर आणि प्रमुख रस्त्यांवरून फिरणाऱ्‍या बुलेटमुळे शांतता भंग होते. नागरिकांना त्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे काही जागरूक नागरिकांनी ही बाब निरीक्षक आगरकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

Youth removing the silencer of the action bullet.
Dhule Crime News : मध्य प्रदेश निवडणुकीमुळे उत्पादन शुल्कची कारवाई

नागरिकांना होणाऱ्‍या त्रासाची गांभीर्याने दखल घेऊन निरीक्षक आगरकर यांनी सोशल मीडियावरून संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने मोहिमेचे नियोजन करण्यात आले. सहकारी सहाय्यक निरीक्षक, दामिनी पथक आणि शोधपथकाला सोबत घेऊन अशा ‘फटाका बुलेट’ जप्त करून पोलिस ठाण्यात नेण्यात आल्या.

तेथे मेकॅनिक तैनात करून सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले. संबंधितांना तातडीने नवीन व नियंत्रित आवाजाचे सायलेन्सर बसविण्यास भाग पाडण्यात आले. अवघ्या तीन दिवसांतच तब्बल १५ बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात आले.

''नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीची वर्तणूक करणे हा गुन्हा आहे. संबंधितांना योग्य ती समज देऊन सायलेन्सर जप्त करण्यात येत आहेत. ही मोहीम कायम सुरू राहील. याबरोबरच ट्रिपल सीट दुचाकीवर जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे याविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. स्वत: नियम पाळा, समाजाला उपद्रव देऊ नका.''- ए. एस. आगरकर, निरीक्षक, शहर पोलिस ठाणे

Youth removing the silencer of the action bullet.
Dhule Crime News : श्री शिवमहापुराण कथास्थळी हातसफाई करणारे तिघे ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.