Dhule News: कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी मनपाकडून कार्यवाही; उपाययोजना सुरू

municipality to control pest diseases Remedies
municipality to control pest diseases Remediesesakal
Updated on

Dhule News : पावसामुळे डासांसह इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कीटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नागरिकांनीही घरस्तरावर उपाययोजना करून डास उत्पत्ती रोखावी, महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. (Action taken by municipality to control pest diseases Remedies started Dhule News)

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. यंदा उशिरा पाऊस सुरू झाल्याने डासांचे प्रमाणही तुलनेने कमी होते. मात्र, काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने डांसाच्या उत्पत्तीला पोषक वातावरण तयार झाले आहे.

डासांचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर विशेषतः डासांमुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया आदी आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

प्रभागनिहाय धुरळणी

शहरातील प्रभाग एकमध्ये धुरळणीच्या कामाला सुरवात झाली. महापालिकेच्या ताफ्यात नुकतेच दोन मोठे फॉगर मशिन दाखल झाले आहेत. या मशिनद्वारे धुरळणीचे काम सुरू करण्यात आले. प्रभागातील भोकर गाव, इंदिरानगर, जिल्हा क्रीडासंकुल परिसर, एकलव्यनगर, श्रमसाफल्य कॉलनी, वलवाडी आदी भागात धुरळणी करण्यात आली.

नगरसेविका वंदना भामरे यांनी या कामाची पाहणी केली. मलेरिया पर्यवेक्षक विकास साळवे, धुरळणीप्रमुख भटू वाघ, सुपर फिल्ड वर्कर अशोक कोठारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

municipality to control pest diseases Remedies
Gatari Amavasya 2023: नाशिककरांकडून आदल्या दिवशीच गटारी! रविवार ठरला खवय्यांसाठी पर्वणी

अशी घ्या काळजी

आठवड्यातून एक दिवस पाण्याचे साठे, सर्व भांडी रिकामी करून घासूनपुसून कोरडी करावीत. घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावेत, झाकण नसल्यास कापडाने ती झाकावीत, घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवावा, डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

घर तसेच परिसरात स्वच्छता ठेवून डासांची उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. घराभोवती पाण्याचे हौद असतील तर त्यात गप्पी मासे सोडावेत. पाणी उकळून, गाळून व थंड करूनच प्यावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या. तापात अॅस्पिरिन किंवा ब्रूफेन अशी औषधे टाळावी.

नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करून आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त विजय सनेर आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील, मलेरिया पर्यवेक्षक विकास साळवे यांनी केले.

उपाययोजनेसाठी यंत्रणा

-कर्मचारी................४५

-फॉगर मशिन............०२

-फवारणीसाठी ट्रॅक्टर....०५

municipality to control pest diseases Remedies
Nashik Monsoon Tourism: वर्षासहलीसाठी पहिने बारी गजबजली! 15 हजारांवर पर्यटक त्र्यंबकनगरीत सहलीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()