धोंडमिसेंची अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कारवाई; 2 पोकलॅण्ड, 4 डंपर जप्त

Vehicle seized in illegal minor mineral case
Vehicle seized in illegal minor mineral caseesakal
Updated on

धुळे : तालुक्यातील रावेर शिवारातील चव्हाणवाडी ते धनगरवाडी या दरम्यान अवैधरीत्या मुरुमचे उत्खनन व चोरी प्रकरणी माहिती मिळाल्यावर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शुक्रवारी धडक कारवाई केली. यात दोन पोकलॅण्ड, चार डंपरसह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले. (Action taken in case of illegal murrum mining of collector Dhodmise 2 poklane 4 dumper seized Dhule Latest Marathi News)

Vehicle seized in illegal minor mineral case
Burglary Case : घर फोडून 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास

घटनास्थळी जात प्रांताधिकारी धोडमिसे, धुळे ग्रामीणचे मंडळाधिकारी सागर नेमाणे, शहरचे मंडळाधिकारी पंडित डावळे, आर्वीचे मंडळाधिकारी बांगर, तलाठी राकेश भोई, अवधानचे तलाठी सी. डी. पाटील, धुळे शहराचे तलाठी कमलेश बाविस्कर, रावेरचे तलाठी शिरसाट यांनी ही कारवाई केली. खासगी व्यक्तींना नव्या शर्तीप्रमाणे दिलेल्या भूखंडांवर मुरुमाचे अवैध उत्खनन व चोरी केली जात होती.

यात धुळे शहरातील काही राजकीय पुढारी सहभागी असून, त्यांनी ग्रामीणच्या एका महिला अधिकाऱ्याच्या संगनमताने हा उद्योग केल्याची चर्चा आहे. मुरुमाचे किती दिवसांपासून उत्खनन सुरू होते, नेमकी किती रकमेची चोरी झाली, यातून कुणी किती अवैध मार्गाने रग्गड पैसा कमविला याची चौकशी करण्याची मागणी रावेर परिसरातून होत आहे.

प्रांताधिकारी धोडमिसे यांच्याकडे तक्रार झाल्यावर मात्र त्यांनी तत्काळ दोन ठिकाणी ही कारवाई केली. त्यात वाडीभोकर येथील भानुदास कचवे यांचे पोकलॅण्ड, मोहाडीतील दीपक पाटील यांचे पोकलॅण्ड आणि चार डंपर जप्त करण्यात आले. प्रांताधिकारी चौकशीअंती दोषींवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडणार आहेत.

Vehicle seized in illegal minor mineral case
Rain Update : नाशिकमध्ये 21 mm पावसाची नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()