Dhule Municipality News : धुळ्यात नायलॉन मांजा आढळल्यास कारवाई; मनपा आयुक्तांचा इशारा

शहरात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक अथवा वापर आढळून आल्यास संबंधितांवर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असा इशारा धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी दिला.
Action to be taken if nylon manja is found in dhule news
Action to be taken if nylon manja is found in dhule news esakal
Updated on

Dhule Municipality News : शहरात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक अथवा वापर आढळून आल्यास संबंधितांवर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असा इशारा धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी दिला. (Action to be taken if nylon manja is found in dhule news)

विशेषतः मकर संक्रांती सणानिमित्त सर्वत्र पंतगोत्सवदेखील पाहायला मिळतो. यंदाही सध्या बच्चे कंपनी पतंग उडवताना दिसतात. पतंग उडविण्यासाठी विशेषतः बच्चे कंपनीत एक वेगळा उत्साह, मज्जा पाहायला मिळते.

आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पंतगासोबतच इतरांच्या पतंगांचा मांजा कापण्यात व नंतर हा मांजा लुटण्याचाही त्यांना एक वेगळा आनंद असतो. पतंगोत्सवादरम्यान मात्र एखादी दुर्घटना झाल्यास आनंदावर विरजण पडते.

इतर कुणाला इजा पोचते. विशेषतः नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राण्यांसह माणसांनाही गंभीर इजा होण्याची शक्यता असते. दरवर्षी कुठे ना कुठे अशा घटना समोर येतात. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचे शासकीय यंत्रणेकडून आवाहन केले जाते.

नायलॉन मांजा विक्री, वापर, साठवणुकीवर शासनाने बंदीच घातल्याने कारवाई देखील होते. तरीही अनेक ठिकाणी या नायलॉन मांजाचा वापर होतो. या पार्श्वभूमीवर यंदाही धुळे महापालिकेतर्फे शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या पत्राचा संदर्भ देत मांजा व पतंग व्यवसाय करणारे, साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.

Action to be taken if nylon manja is found in dhule news
Makar Sankranti 2024: पतंगप्रेमींनी बाजारपेठ फुलली! 2 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत दर

संबंधितांवर कारवाई

धुळे शहरात नायलॉन मांजा वापर, विक्री व साठवणूक करू नये. सदर नायलॉन मांजा वापर, विक्री व साठवणूक करताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध अधिनियमातील कलमानुसार धुळे महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त अमिता दगडे यांनी दिला आहे.

नायलॉन मांजाचे दुष्परिणाम

प्लॅस्टिक किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थापासून बनवलेला नायलॉन मांजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्क्या धाग्यांच्या वापरामुळे पक्ष्यांना तसेच मानवास गंभीर इजा होण्याची शक्‍यता असते.

पतंग उडवताना वापरण्यात येणारे असे धागे कापून किंवा पडल्यामुळे माती, पाण्याचे मार्ग व गुरांच्या लोकसंख्येवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी जे जैवविघटन करू शकत नाहीत, मातीच्या थराला स्पर्श केल्यावर पर्यावरण आणि प्राण्यांना प्रचंड इजा होऊ शकतात. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी अशा नायलॉन धाग्यांचा वापर टाळावा.

Action to be taken if nylon manja is found in dhule news
Dhule News : मला कोणी न्याय देईल का न्याय! पीएम किसानची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.