Dhule Crime: दूध भेसळ नियंत्रण समितीची धुळे शहर, साक्रीत कारवाई; 200 लिटर भेसळदूध नष्ट,गुन्हा दाखल

Milk Adulteration
Milk Adulterationesakal
Updated on

Dhule Crime: दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्याच्या कारवाईत पथकाने धुळे शहरासह साक्री तालुक्यात कारवाई केली. या कारवाईत पथकाने धुळ्यात एकूण १३१ लिटर, तर साक्री तालुक्यात ७३ असे एकूण २०४ लिटर भेसळ दूध नष्ट केले.

याशिवाय दुग्धजन्य पदार्थांचे दोन नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले. (Active Action of Milk Adulteration Control Committee Dhule City 200 liters of milk destroyed dhule news )

दरम्यान, धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर एका ठिकाणी कारवाईदरम्यान त्रयस्थ व्यक्तींनी पथकातील कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती दूध भेसळ नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी दिली.

धुळे जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती संयुक्त पथकाने दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास-चव, अस्वच्छता आढळलेल्या दूध विक्रेत्यावर कारवाई केली.

कारवाई समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एम. शिंदे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, निरीक्षक वैधमापनशास्त्र आर. सी. पाटील, सहाय्यक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी व्ही. व्ही. गरुड, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातील पशुधन पर्यवेक्षक चिन्मय सोनवणे, विस्तार संकलन, प्रीतेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, शासकीय दूध योजना धुळेचे विजय भदाणे, पोलिस प्रशासनातील त्या-त्या परिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली.

Milk Adulteration
Dhule Crime News : महामार्गावर 65 लाखांच्या गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त; एकाला अटक

धुळ्यात १३१ लिटर दूध नष्ट

धुळे शहरातील नकाणे रोड, वाडीभोकर रोड, तुळशीरामनगर आदी परिसरात दूध विक्री संकलन करून विक्री करणाऱ्या डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले यांच्याकडील दुधाची ३ ऑक्टोबरला तपासणी करण्यात आली.

एकूण सहा दूध विक्रेत्यांकडील सरासरी २५१ लिटर दुधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची कार्यवाहीस्थळी तपासणी केली असता, त्यांपैकी पाच दूध विक्रेत्यांच्या काही दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास चव, कचरा, अस्वच्छता आढळून आली. भेसळ आढळून आलेले सरासरी १३१ लिटर (गायीचे ३६ लिटर, म्हशीचे ९५ लिटर) दूध तत्काळ नष्ट करण्यात आले.

साक्री परिसरातही कारवाई

साक्री तालुक्यातील शहरी परिसरात सहा दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांकडील सरासरी ६२३ लिटर दुधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची तपासणी केली असता, त्यापैकी तीन दूध विक्रेत्यांच्या काही दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास चव, कचरा, अस्वच्छता आढळून आली. भेसळ आढळून आलेले म्हशीचे सरासरी ७३ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

Milk Adulteration
Dhule Crime News : शिंदखेड्यात अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त; 4 दिवसांनंतर गुन्हा दाखल

दुग्धजन्य पदार्थांची तपासणी

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत साक्री येथील न्यू खेतेश्वर स्वीट्स यांच्याकडील दुग्धजन्य पदार्थाचे दोन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच वैधमापनशास्त्र विभाग धुळे यांच्यासोबत संयुक्त पथकाद्वारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र यांचे मुद्रांकनाची पडताळणी करण्यात आली.

यात तीन दूध विक्रेत्यांच्या डेअरीतील/वापरातील वजन-मापे ही मुद्रांकन व पडताळणी उल्लंघन आढळून आल्याने संबंधितांवर वैधमापनशास्त्र अधिनियमांतर्गत खटले नोंदविण्यात आले. दरम्यान, दूध भेसळ नियंत्रण समितीची धडक कारवाई अविरत सुरू राहणार असल्याचे समितीने म्हटले आहे.

धमकीप्रकरणी गुन्हा

वाडीभोकर रोड येथील साईकृष्णा दुग्धालय यांच्याकडील दुधाच्या तपासणीत पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास आढळून आल्याने

त्यांच्याकडील भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. दरम्यान, तेथे तीन-चार त्रयस्थ व्यक्तींनी समिती सदस्य व शासकीय कर्मचारीसमवेत चुकीचे आरोप करून मारहाण करण्याची धमकी व भांडणसदृश परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध देवपूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Milk Adulteration
Jalgaon Crime : दुचाकीला टांगलेल्या पिशवीतून 1 लाख 10 हजार लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.