Dhule News : कोळसापाणीच्या चांदणीला आधार! भावाबहिणींची प्रशासन घेणार जबाबदारी

Dhule News : कोळसापाणीच्या चांदणीला आधार! भावाबहिणींची प्रशासन घेणार जबाबदारी
Updated on

Dhule News : मरण म्हणजे काय असते हे कळण्याची समज आणि उमज नसलेल्या वयात तिच्यावर आभाळ कोसळले. दोन वर्षांपूर्वी वडील मरण पावले. त्यांच्यानंतर डोक्यावर छत्र धरून उभी राहिलेली आई अपघातात गंभीर जखमी झाली.

ती कधी बरी होईल याची प्रतीक्षा लागून आहे. या आघाताने कोसळू पाहणाऱ्या चांदणी पावरा हिच्या आयुष्याला आधार देण्यासाठी शिरपूरच्या प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी पुढे सरसावले. तिच्या आयुष्यातली वडील आणि भावांची उणीव भरून निघणार नसली तरी आपल्या परीने वाटा उचलण्यास सर्व जण सिद्ध झाले आहेत. (administration will take responsibility of brother and sister dhule news)

चारणपाडा (ता. शिरपूर) येथे ४ जुलैला सकाळी भरधाव ट्रेलर हॉटेलमध्ये शिरून झालेल्या अपघातात दहा जण ठार, तर २८ जण जखमी झाले. त्यात कोळसापाणी पाडा येथील महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घरात कर्ते कोणीच नसल्याने शेजाऱ्यांवर विसंबून असलेली तिची मुलगी चांदणी व मुलगा दररोज झोपडीच्या दाराशी आई कधी येईल याची वाट पाहत बसतात. अपघातात पाच जण गमावलेल्या आणि त्याहून अधिक जायबंदी झालेल्या कोळसापाणी गावात कोणी कोणाला आधार द्यावा अशी परिस्थिती आहे.

या अपघातातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. ६) प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार महेंद्र माळी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांनी कोळसापाणी पाडा येथे भेट दिली. चांदणीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रांताधिकारी भामरे भावुक झाले. त्यांनी तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule News : कोळसापाणीच्या चांदणीला आधार! भावाबहिणींची प्रशासन घेणार जबाबदारी
Dhule Employment Fair : धुळ्यात 3081 रिक्त पदांसाठी मुलाखती; या संकेतस्थळावर करा नोंदणी

आईशिवाय घरात कोणीच कमावते नाही, आता आईदेखील जखमी आहे मग त्यांचा निर्वाह चालणार कसा, अशा विचारातून सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून त्यांनी तातडीने पावले उचलली. महिला व बालसंगोपन योजनेत एकल पालक सहाय्यतांतर्गत चांदणी व तिच्या भावाचे अर्ज भरून घेतले. तिच्या आईच्या नावानेही कुटुंब अर्थसहाय्य योजना व संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरण्यात आले असून, ती रुग्णालयातून घरी येताच लाभ दिला जाणार आहे.

अन्य पीडितांनाही लाभ

कोळसापाणी पाडा येथील कुटुंबांना या अपघाताचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांची विचारपूस करून तहसीलदार महेंद्र माळी यांनी तातडीने शिधापत्रिकांसाठीचे अर्ज भरून घेतले. या कुटुंबांना प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना, कुटुंब अर्थसहाय योजनेचाही लाभ त्यांना दिला जाणार आहे.

ग्रामसेविकेने घेतली भविष्याचीही जबाबदारी

कोळसापाणी पाडा येथील ग्रामसेविका सुनीता मोरे यांनी चांदणीच्या शिक्षणापासून ते विवाहापर्यंतचा खर्च उचलण्याची जाहीरपणे तयारी दर्शविली. तिच्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी येथील महसूल विभागाने संयुक्तपणे घेतली. तेथील कुटुंबांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांची मदत येण्यापूर्वीच प्रशासनाने सहृदयपणे गावात जाऊन दिलेल्या मदतीने ग्रामस्थांच्या जखमांवर किमान फुंकर घातली गेली.

Dhule News : कोळसापाणीच्या चांदणीला आधार! भावाबहिणींची प्रशासन घेणार जबाबदारी
Sharad Pawar In Dhule : या तारखेला शरद पवार धुळ्यात; पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आज बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.