Dhule News : कोरोनानंतरही ‘पॉवरलूम’ला उभारी मिळेना; हजारो कामगारांची आर्थिक ओढाताण सुरूच

power loom industry
power loom industryesakal
Updated on

धुळे : कोरोनाकाळात अनेक उद्योगधंदे बंद झाले. धुळे शहरातील पॉवरलूम उद्योगालाही याचा मोठा फटका बसला. दरम्यान, कोरोनानंतरही पॉवरलूम उद्योगाला पाहिजे तशी उभारी मिळत नसल्याचे चित्र आहे. कापसाचे दर, कापड बाजारात असलेली दोलायमान स्थिती यामुळे पॉवरलूमधारकांसह विशेषतः त्यावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांची मोठी ओढाताण सुरू आहे. आजही काही पॉवरलूम आठवडाभरात तीन-चार दिवस बंद असतात. त्यामुळे कामगार अडचणीत आहेत. दुसरीकडे या उद्योगाकडे सरकार लक्षच द्यायला तयार नाही, अशी खंत या क्षेत्रातील संघटनांनी केली व्यक्त आहे. (after Corona Powerloom not start yet Thousands of workers continue to suffer financially Latest Dhule News)

शहरात हजारखोली, ऐंशीफुटी रोड, तिरंगा चौक, मौलवीगंज, वडजाई रोड आदी मुस्लिमबहुल भागात अनेक वर्षांपासून पॉवरलूम व्यवसाय सुरू आहेत. विविध अडचणी, समस्या असताना हा व्यवसाय टिकून आहे. हजारो कामगारांची रोजीरोटी याच व्यवसायावर अवलंबून आहे. कोरोना महामारीपूर्वी दहा हजारांवर पॉवरलूम होते. त्यांपैकी जवळपास दोन हजार पॉवरलूममध्ये रंगीत साड्या तयार करण्याचे काम होते. पॉवरलूममुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या आठ ते दहा हजार लोकांना रोजगार प्राप्त होतो. दरम्यान, कोरोनाकाळात इतर उद्योगांप्रमाणेच किंबहुना पॉवरलूम व्यवसायाला मोठा फटका बसला.

२०२० मध्ये लॉकडाउन झाल्यानंतर पॉवरलूम कामगार रोजगारापासून वंचित आहेत. २०२१ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यावर व्यवसाय पुन्हा उभारी घेईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात आजही तशी उभारी मिळालेली नाही अथवा पूर्वपदावर हा व्यवसाय आलेला नाही. तसेच कोरोनामुळे काही कामगार स्थलांतरित झाले, तर काहींनी रोजीरोटीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी इतर कामे सुरू केली. दरम्यान, आता कोरोना संकट ओसरल्यानंतरही या व्यवसायातील प्रश्‍न, संकटे संपलेली नाहीत.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

power loom industry
Nandurbar Crime News : कोपर्लीतून 42 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

दर वाढल्याने चिंता

कापडासाठी लागणारा कच्चा माल अर्थात कापसाचे दर वाढल्याने अथवा चढ-उतार कायम असल्याने तसेच कापड उद्योगात मंदीचे सावट अद्यापही असल्याने पॉवरलूमला फटका बसत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या व्यवसायासाठी इतर राज्यांतून धुळ्यात येणारे सूत महागडे आहे. या दरावर दरावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याची तक्रार पॉवरलूम व्यावसायिकांची आहे.

एकदा सूत खरेदीनंतर कापड विक्री करेपर्यंतच्या कालावधीत दर बदलत राहिल्याने कापडाची विक्री नेमक्या किती दराला करायची याचा अंदाजही पॉवरलूम व्यावसायिकांना येत नाही. कापड उत्पादन खर्चाच्या तुलनेत पॉवरलूम व्यावसायिकांना विक्रीतून अपेक्षित लाभ होत नाही. त्यामुळे या व्यवसायाला फटका बसत आहे. या विविध समस्यांमुळे काही पॉवरलूम आठवड्यातून तीन-चार दिवस चालतात. तीन-चार दिवस बंद असतात. त्यामुळे तेथील कामगारांना आर्थिक ओढाताण सहन करावी लागते. इतर काही पॉवरलूम आठवडाभर चालतात, असेही व्यावसायिकांनी सांगितले.

"कोरोनानंतरही पॉवरलूम व्यवसायाला पाहिजे तशी उभारी मिळालेली नाही. आजही काही पॉवरलूम आठवडाभर चालू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. सध्या कापसाचे, सुताचे दर जास्त असल्याने फटका बसत आहे. या उद्योगांमध्ये यापूर्वीच्या समस्याही ‘जैसे थे’ आहेत. सरकारचे या व्यवसायाकडे दुर्लक्ष असल्याने कोणत्याही समस्या मिटलेल्या नाहीत. कामगारांचे प्रश्‍न कायम आहेत. बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा जसा लाभ मिळतो त्या धर्तीवर पॉवरलूम कामगार कल्याण महामंडळ हवे. ज्यातून कामगारांना, त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय योजनांचा थोडाफार आधार मिळू शकेल."

-इरफान मणियार, सचिव, खानदेश रहेबर पॉवरलूम मजदूर युनियन

power loom industry
Nashik Political News : शिंदे- ठाकरे गटांत शाब्दिक धुमश्चक्री; नाशिकमध्ये वाद पेटला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()