Dhule Municipality News : हुश्‍श..! साडेचार वर्षांनंतर अर्धे उत्तर सापडले; सभापती-सदस्यांत जुंपली

Member Harsh Kumar Raylan speaking in the Municipal Standing Committee meeting. Speaker Kiran Kulewar, Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh in front.
Member Harsh Kumar Raylan speaking in the Municipal Standing Committee meeting. Speaker Kiran Kulewar, Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh in front.esakal
Updated on

Dhule Municipality News : शहरातील मनपा मालकीच्या जागेवर उभारलेल्या बीओटी तत्त्वावरील दोन शॉपिंग कॉम्प्लेक्सपोटी मनपाला उत्पन्न का मिळत नाही, गाळ्यांचे भाडे कोण वसूल करतंय या साध्या प्रश्‍नावर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत गुरुवारी (ता. ३०) पुन्हा खल पाहायला मिळाला.

या विषयावरून प्रश्‍नकर्ते सत्ताधारी भाजपचे नगरसेवक हर्षकुमार रेलन व सभापती किरण कुलेवार यांच्यात जुंपली. (After four years answer was found from dhule municipal dhule news)

शेवटी शासनाच्या नव्याने आलेल्या शासन निर्णयाचा आधार प्रशासनाला मिळाला. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांपासून मांडण्यात येणाऱ्या प्रश्‍नाला थोडेफार का होईना प्रशासनाला उत्तर सापडले.

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सदस्य श्री. रेलन यांनी पुन्हा एकदा पारोळा रोडवरील तसेच मनोहर थिएटरजवळील बीओटी तत्त्वावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सपोटी महापालिकेला शून्य उत्पन्न कसे, या कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचे भाडे कोण वसूल करतंय, असे प्रश्‍न मांडले.

या दोन्ही कॉम्प्लेक्ससंदर्भात बेकायदा करार झाले आहेत, असे म्हणत श्री. रेलन यांनी दरमहा दोन ते चार कोटी रुपये जातात कुठे, २०१६ पासून भाडेवसुली कुणी केली, असा सवाल श्री. रेलन यांचा होता. या प्रश्नावरून मागील सभेचा संदर्भ देत त्यांनी सभापतींनाही डिवचले. त्यावरून सभापती श्रीमती कुलेवार व श्री. रेलन यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळाले.

पूर्वलक्षी प्रभावाने भाडे

श्री. रेलन यांच्या प्रश्‍नावर प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांनी ६ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत शासनाने शॉपिंग कॉम्प्लेक्स भाडेवसुलीबाबत नवीन कार्यपद्धती तयार केली आहे. या नव्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. यावर श्री. रेलन यांचे समाधान झाले नाही.

Member Harsh Kumar Raylan speaking in the Municipal Standing Committee meeting. Speaker Kiran Kulewar, Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh in front.
Dhule Municipality News : मागण्यांसाठी बदली सफाई कामगारांची महासभेत एन्ट्री

बाजार विभागप्रमुख किशोर सुडके यांनी भाड्यापोटी संबंधितांकडून धनादेश मिळाले होते, मात्र दराबाबत आक्षेप असल्याने ते स्वीकारले नाहीत, असे सांगितले. शेवटी अतिरिक्त आयुक्त श्रीमती डहाळे यांनी २०१६ पासूनचे पूर्वलक्षी प्रभावाने भाडे वसूल केले जाईल, असे सांगितले. या उत्तरानेही श्री. रेलन यांचे समाधान झाले नाही.

आर्किटेक्ट नेमणुकीवरूनही जुंपली

महापालिकेच्या जुन्या हेरिटेज इमारतीचे नूतनीकरण, डिजिटायझेशन, फर्निचर कामासाठी आर्किटेक्ट नियुक्तीच्या प्रश्‍नावरूनही श्री. रेलन व सभापती श्रीमती कुलेवार यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळाले.

आर्किटेक्ट नेमताना जाहिरात द्या, स्पर्धा होऊ द्या व त्यानंतर नियुक्ती करा, धुळ्यातही या विषयावर काम करणारे आर्किटेक्ट आहेत, त्यांनाही संधी मिळेल, विरोधकांना आरोप करायला संधी मिळते, असे श्री. रेलन यांचे म्हणणे होते.

मात्र, सभापती श्रीमती कुलेवार यांनी आपला विरोध नोंदविला आहे, रुलिंग दिले गेले आहे, असे म्हणत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावर माय पॉवरमध्ये काम करू नका, अगोदरच ठरवलेले असेल तर चर्चेला का बोलावता, असा सवाल श्री. रेलन यांनी केला. मात्र, त्यानंतरही हा विषय मंजूर करण्यात आला.

Member Harsh Kumar Raylan speaking in the Municipal Standing Committee meeting. Speaker Kiran Kulewar, Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh in front.
Dhule Municipality News : 16 कोटींच्या ‘स्वप्नां’मुळे बजेट 939 कोटींवर! ‘बीओटी’ कॉम्प्लेक्सच्या उत्पन्नावर घमासान

पालकमंत्र्यांच्या शब्दालाही किंमत नाही

मनपा शाळा १४ च्या प्रस्तावावरूनही श्री. रेलन यांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी निर्देश दिलेले असताना तत्परतेने कार्यवाही होत नाही. पालकमंत्र्यांच्या शब्दाला किंमत दिली जात नाही, त्यांना काय उत्तर द्यावे, असे श्री. रेलन म्हणाले. या विषयावर आर्किटेक्ट नियुक्त केल्याचे अभियंता शिंदे म्हणाले.

मात्र, संबंधित आर्किटेक्टचे जुने बिल बाकी असल्याने ते हे काम करायला उत्सुक नसल्याचे श्री. रेलन यांनी सांगितले. आपण टॉवर गार्डनदेखील सुरू करू शकलो नाही, असेही श्री. रेलन म्हणाले. त्यावर अभियंता शिंदे यांनी यासाठी आता निधी मिळाल्याचे स्पष्ट केले.

Member Harsh Kumar Raylan speaking in the Municipal Standing Committee meeting. Speaker Kiran Kulewar, Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh in front.
Dhule Municipality News : प्लॅस्टिक विक्रेत्यांना महापालिकेचा दणका; 5 टन प्लॅस्टिक जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()