धुळे : कोरोना संसर्गाच्या तब्बल अडीच वर्षांनंतर शहरातील मालेगाव रोडवरील श्री आई रेणुकामाता अर्थात यल्लमादेवी यात्रोत्सवानिमित्त निघालेली पालखी बुधवारी (ता. २१) उत्साहात पार पडली. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर श्री यल्लमादेवी मंदिर येथून पालखी मिरवणुकीला सुरवात झाली. सोहळ्यात समाजबांधवांसह भाविकांनी मोठी गर्दी केली. (After two half years Crowd at Kalbadevi Palkhi ceremony Dhule News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
महापौर प्रदीप कर्पे, श्री महामंडलेश्वर पार्वती रवी पुजारी, ट्रस्टचे अध्यक्ष बबन जिरेकर, उपमहापौर नागसेन बोरसे, महापालिका स्थायी समिती सभापती शीतल नवले, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसेवक हिरामण गवळी, यलमार समाजाचे ज्येष्ठ नेते संजय शेंडे, मुकुंद कोळवले, अशोक कोरे, अनिल संचेती, जीवन शेंडगे, ओम खंडेलवाल, अशोक चौगुले, नंदू अजळकर, गजेंद्र अंपळकर, मयूर खोपडे, सुखदेव अंपळकर, अशोक मंगीडकर, मयूर कंड्रे, राजेंद्र जिरेकर, सचिन शेवतकर, अविनाश लोकरे, नाना लोकरे, दीपक वंगवर याच्यांसह यलमार समाजबांधव सहभागी झाले. श्री आई यल्लमा रेणुका देवी मंदिर ट्रस्ट व यलमार समाजाने संयोजन केले. रविवारी २५ डिसेंबरला दुपारी बारा ते तीनदरम्यान महाप्रसादाचे वाटप होईल.
तत्पूर्वी, पालखी मिरवणुकीचे खंडेराव बाजार व दंडेवाला बाबा ग्रुपतर्फे पुष्पवृष्टीने स्वागत झाले. भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप झाली. माजी नगरसेवक गोविंद साखला, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, नवाब बेग मिर्झा, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष जोसेफ मलबारी, मनोज गर्दे, राजेंद्र ढवळे, बज्जू साखला, विक्की परदेशी, संतोष परदेशी, मोहन टकले, रतन वाघमारे, राजू साखला, कैलास कासार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.