Dhule Fake Fertilizer Scam : जिल्ह्यात किती गोण्यांचे वितरण? फिर्यादीत वितरकांची नावे येणार की नाहीत?

Agriculture Officer during inspection of fake fertilizer stock.
Agriculture Officer during inspection of fake fertilizer stock. esakal
Updated on

Dhule Fake Fertilizer Scam : कृषी यंत्रणेला येथील एमआयडीसीतील गुदामात १३ लाखांवर किमतीचा बनावट खतसाठा आढळला. मोहाडी पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार तीन महिन्यांपासून हा गैरउद्योग सुरू होता.

या कालावधीत असा खतसाठा जिल्ह्यात किती वितरकांकडे (डिस्ट्रिब्यूटर्स) गेला? एकूण किती गोण्या वितरीत झाल्या? त्यातून किती रकमेची गैरउलाढाल झाली? शेतकऱ्यांसह शासनाची कशी फसवणूक झाली आदी प्रश्‍नांची उकल कृषी आयुक्तांसह मोहाडी पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.

तसेच त्यांना फिर्यादीत त्या वितरकांची नावे समाविष्ट केली जाणार की नाहीत, हे शेतकरीहितासाठी स्पष्ट करावे लागणार आहे. (agriculture department found stock of fake fertilizer worth 13 lakhs in warehouse of MIDC dhule news)

मोहाडी पोलिस ठाण्यात बनावट खतसाठा प्रकरणी ८ जुलैला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे खत निरीक्षक तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरूण तायडे यांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्यात भूमी क्रॉप सायन्सचा चालक नरेंद्र श्रीराम चौधरी (रा. धुळे), बनावट खतपुरवठा करणारी गुजरातमधील मे. फार्म सन्स फर्टीकम प्रा. लि. (सुरत), बनावट खत पॅकिंगसाठी वापरातील गोण्यांवर नावाची छपाई असलेल्या मे. ग्रीन फिल्ड ॲग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा. लि.चा (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) समावेश आहे.

काही अनुत्तरित प्रश्‍न

फिर्यादीत १८ः१८ः१० या खताच्या ब्रॅन्ड नेममध्ये कृषी राजा, कृषी सम्राट, तसेच काही दाणेदार खत बनावट स्वरूपाचे असल्याचा उल्लेख आहे. तपासणीतील नमुन्यात फॉस्पो जिप्सम (ग्रॅन्युअल) असल्याचा संशय व्यक्त झाला आहे. फॉस्पो जिप्सम गुजरातमधून फक्त दोन रुपयांत खरेदी करून ते संगनमताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति ५० किलो गोणीप्रमाणे तब्बल एक हजार २३५ रुपयांना विक्री केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Agriculture Officer during inspection of fake fertilizer stock.
Dhule News : मेडिकल कॉलेज, रुग्णालयासाठी 25 कोटी मंजूर; आमदार शाह यांची माहिती

कृषी व पोलिस यंत्रणेने बनावट खतसाठा प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र, असा खतसाठा जिल्ह्यात कुठे-कुठे वितरित झाला? अनुमानीत तीन महिन्यांच्या कालावधीत किती गोण्या शेतकऱ्यांना विक्री झाल्या? त्या गोण्यांची विक्री कुठल्या वितरकांनी केली? त्यातून किती रकमेची गैरउलाढाल झाली? असे अनेक प्रश्‍न कृषी आयुक्तांच्या चौकशीसह पोलिसांच्या तपासाचा भाग ठरणार आहेत.

कृषी यंत्रणेकडे लक्ष

छाप्यात यंत्रणेला बनावट खताच्या एक हजार २० आणि कृषी राजाच्या एक हजार १७० रिकाम्या गोण्या आढळल्या आहेत. याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर खतसाठ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे स्पष्ट दिसून येते. वास्तविक, त्याच वेळी कृषी यंत्रणेने बनावट खतसाठा एमआयडीसीतील वादग्रस्त गुदामातून नेमका कुठे वितरीत केला जात होता, कुठले वितरक तो साठा ताब्यात घेऊन विक्री करत होते, याचा तपास करणे गरजेचे होते.

तसेच मोहाडी पोलिसांच्या मदतीने या प्रश्‍नांची उकल करण्याची गरज होती. जो गैरव्यावसायिक बनावट खताचा लाखो किमतीचा साठा बाळगतो, तो विक्रीसाठी जिल्ह्यातील वितरकांना दिल्याशिवाय राहाणार नाही. ही बाब सर्वसामान्यांना कळू शकते, तर कृषी यंत्रणेला का कळू शकत नाही? हा संशोधनाचा भाग असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Agriculture Officer during inspection of fake fertilizer stock.
Dhule Fake Fertilizer Case : धूळफेकीसह फसवणुकीचा कळस! फॉस्पो जिप्समची तब्बल बाराशे रुपयांवर विक्री

कृषी यंत्रणेला ते माहीत असेल तर त्या वितरकांची नावे मोहाडी पोलिसांना देऊन तपासाला सहकार्य केले किंवा नाही हेही कृषी अधिकाऱ्यांनी जाहिर करण्याची गरज शेतकरी व्यक्त करतात. शिवाय मोहाडी पोलिसांनीही या दिशेने तपासाला गती देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका वठवावी, अशी अपेक्षा व्यक्त होते.

सोनगीर, नेर, शिरपूर रडारवर...

बनावट खतसाठा धुळे तालुक्यातील सोनगीर, नेर आणि शिरपूर येथील एकूण तीन वितरकांच्या माध्यमातून जिल्ह्यात वितरित झाल्याची धक्कादायक माहिती चर्चेतून पुढे येत आहे. त्यामुळे या तीन ठिकाणचे संबंधित कृषी निविष्टा वितरक तपासाच्या रडारवर असल्याचे सांगितले जाते.

यादृष्टीने कृषी यंत्रणा आणि मोहाडी पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केला, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. किंबहुना शेतकरी हितासाठी या यंत्रणांना मुळापर्यंत चौकशीसह तपास करावा लागणार आहे. त्यामुळे कृषी आयुक्त आणि पोलिसांच्या भूमिकेकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.

Agriculture Officer during inspection of fake fertilizer stock.
Dhule News : दहिवदला नाल्याच्या बाजूला होतात अंत्यसंस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.