Dhule Ajit Pawar : राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला : अजित पवार

Ajit Pawar on the entry of former ZP vice president Dnyaneshwar Bhamre into NCP party Neighbors Jayant Patil, Chhagan Bhujbal
Ajit Pawar on the entry of former ZP vice president Dnyaneshwar Bhamre into NCP party Neighbors Jayant Patil, Chhagan Bhujbal esakal
Updated on

Dhule Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या कांदा, कापूस उत्पादनाला भाव नाही. शेतकऱ्यांची चेष्टा करणारे सरकार ७५ वर्षात कधीच पाहिले नाही.

कांदा खरेदीसाठी नाफेडला का सांगत नाही, राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून दरिद्री, उलट्या पायाचे सरकार घालविण्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून द्या.

आगामी काळातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. (Ajit Pawar statement about corruption dhule news)

येथील केशरानंदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेतकरी, शेतमजूर, महिला व युवक मेळावा व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांचा पक्षप्रवेश झाला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार अनिल पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पक्ष निरिक्षक अर्जुन टिळे, माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, माजी आमदार अनिल गोटे, रामकृष्ण पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा,

माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, नानाभाऊ मराठे, जुई देशमुख, किरण पाटील, इर्शाद जहागीरदार, नाजीम शेख, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, रविराज भामरे, शिवराज भामरे, ललित वारुळे, रणजित भोसले, किरण पाटील, पूजा खडसे, अमित पाटील, मनोज महाजन, समता परिषदेचे राजेश बागूल, माजी सभापती राजेंद्र भांगरे, भूपेंद्र धनगर आदी उपस्थित होते.

अनेक आमदार घरवापसी करतील : पाटील

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, देशात ४० टक्के टक्के कमिशन घेणारे कर्नाटकाचे सरकार गेले. आगामी काळात खोकेबाज सरकार जाईल. मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. श्री. भामरे सातत्याने काम करण्याची चिकाटी आहे. सरकार मधील अनेक आमदार घरवापसी करतील, राज्यातील वातावरण बदलत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ajit Pawar on the entry of former ZP vice president Dnyaneshwar Bhamre into NCP party Neighbors Jayant Patil, Chhagan Bhujbal
Ajit Pawar : '...मग मलाही चांगलीच जिरवता येते, मागे लागलो ना!', अजित पवारांचा थेट इशारा

सत्तेसाठी लाचारी असलेल्यांना पाठीचा कणा राहिलेला नाही. राज्यातली जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. यातून सरकारने लोकप्रियता तपासावी. असे त्यांनी नमूद केले. प्रस्तावना सुरेश सोनवणे यांनी केली. सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी तर आभार ज्ञानेश्वर भामरे यांनी मानले.

राज्यात आठ ठिकाणी दंगली

अजित पवार म्हणाले, गद्दारी करून हे सरकार आले आहे. पन्नास खोके आणि एकदम ओके असे या गद्दारांची ओळख आहे. महाविकास आघाडीच्या काळातील जनतेच्या विकासाचा निधी या सरकारने थांबविला. राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम चालले आहे. राज्यात आठ ठिकाणी दंगली घडल्या. महाराष्ट्र कोणत्या दिशेला जातो आहे हा विचार केला पाहिजे.

भाकरी फिरवायचे काम सुरू

ज्ञानेश्वर भामरे यांच्या प्रवेशाबाबत श्री. पवार म्हणाले, ज्ञानेश्‍वर भामरे यांची घर वापसी झाली आहे. जिव्हाळ्याचे संबंध असतानाच कसे गेले, आता कोणत्याही अटी शर्ती शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल आनंद आहे. पक्षात भाकरी फिरवायचे काम सुरू आहे, पाडापाडीचे राजकारण करू नका. नवीन तरुण पिढीला संधी द्यावी असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Ajit Pawar on the entry of former ZP vice president Dnyaneshwar Bhamre into NCP party Neighbors Jayant Patil, Chhagan Bhujbal
Ajit Pawar : सरकार टिकवण्यााठी ते ४० आमदार… ; अजित पवारांचे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गंभीर आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.