Nandurbar News : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठूरायाच्या भक्तांसाठी अक्कलकुवा आगारातून बस सेवेचा प्रारंभ आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला जातात. तर काही भाविक एसटी बसने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात.(Akkalkuwa Agar Commencement of bus service for Ashadhi Nandurbar News)
भाविकांसाठी विठूरायाचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी अक्कलकुवा आगारातून बस सेवा सुरु झाली असून तिचा प्रारंभ आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.
तसेच, २८ जूनपर्यंत दररोज बस सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहतूक निरीक्षक भावेश गोस्वामी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक हिरालाल सूर्यवंशी, जी. पी. राठोड, डी. के. चित्ते, वाय. आय. चव्हाण, सी. बी. इंगळे, आर. एस. जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.