Dhule News: राजकारणी, अधिकाऱ्यांनी ‘खेळ मांडला’! अक्कलपाडा पाणीयोजना कार्यान्वितचा प्रश्‍न

Water Supply
Water Supplyesakal
Updated on

Dhule News : शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी व धुळेकरांना रोज पाणी मिळणार असे स्वप्न दाखविणाऱ्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास येण्याबाबत ‘तारीख पे तारीख’चा खेळ म्हणजे धुळेकरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे.

राजकीय मंडळींकडून होणारी आश्‍वासनांची खैरात एकवेळ लोकांच्या अंगवळणी पडलेला प्रकार आहे.

पण अधिकाऱ्यांकडून याबाबत होणारी विविध कारणे न शोभणारी व अगदीच लायकी काढणारी असल्याचे पाहायला मिळत आहे. (Akkalpada water scheme implementation issue Dhule News)

धुळे शहरवासीय पिण्याच्या पाण्यासाठी बाराही महिने तहानलेले असतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यावर राजकीय मंडळींनी धुळेकरांकडून मते मागितली.

अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेद्वारे रोज शुद्ध पाणी मिळण्याचे स्वप्न दाखविले गेले. महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीतही या योजनेवर प्रचार झाला. अखेर भाजपच्या हातात सत्ता आल्यानंतर योजनेसाठी निधी मंजूर झाला.

प्रथम मंजूर झालेल्या या योजनेला ९ ऑगस्ट २०१९ ला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. अस्तित्वात असलेल्या तापी व डेडरगाव पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीसह एकूण १६९.१३ कोटी रुपयांची ही योजना ठरली.

तापी व डेडरगाव पाणीयोजनेच्या बळकटीकरणाचे काम वगळता ही योजना साधारण १५८ कोटी रुपये खर्चाची आहे. मुळातच पूर्वीची वादग्रस्त ठरलेल्या १३६ कोटींच्या (प्रत्यक्षात १५४) पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारालाच नवीन अक्कलपाडा पाणीयोजनेचे काम मिळाल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित झाले.

या प्रश्‍नांवर मात करत योजनेचे काम सुरू झाले. मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने स्वाभाविकपणे योजनेचे कामही मागे पडले. मात्र, कोरोना संकटानंतर योजनेचे काम ज्या गतीने व्हायला पाहिजे होते, त्या गतीने ते झाले नाही.

आश्‍वासनबाजी सुरू

आता महापालिकेची नवीन निवडणूक तोंडावर आलेली असताना योजना कार्यान्वित होऊ शकलेली नाही. अर्थात निवडणूक लागेपर्यंत ती पूर्ण होईल आणि त्याचा राजकीय फायदाही घेतला जाईल यात शंका नाही.

पण, गेल्या काही महिन्यांपासून योजनेच्या कार्यान्वित होण्याच्या अनुषंगाने सुरू असलेली ‘आश्‍वासनबाजी’ धुळेकरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Supply
Deepak Kesarkar: शासकीय शाळांमध्ये बालवाडीपासून शिक्षण : दीपक केसरकर

पुन्हा महिना लोटला

जून २०२३ मध्ये योजनेद्वारे हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने जल्लोष केला व येत्या १५ दिवसांत धुळेकरांना पाणी मिळेल, असे आश्‍वासन दिले गेले.

अर्थात जूनअखेर हे आश्‍वासन पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जुलैदेखील निघून गेला तरी योजना आश्‍वासनांच्या गर्तेतच अडकलेली आहे.

अभियंत्यांवर प्रश्‍नचिन्ह

अक्कलपाडा पाणीयोजनेचे काम एमजेपीच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, यापूर्वीच्या योजना व अक्कलपाड्याची महत्त्वाकांक्षी योजनेचे काम पाहता एमजेपीच्या कार्यपद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह उभे आहे.

तब्बल दीडशे कोटी रुपये खर्चाच्या योजनेसाठी इलेक्ट्रिसिटीची नेमकी गरज काय असणार आहे, हे योजना पूर्णत्वाकडे असताना लक्षात येणे व त्यानंतर त्यात बदल होणे म्हणजे या संपूर्ण योजनेवर काम करणाऱ्या विशेषतः अभियंत्यांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे आहे.

त्यामुळे एकूणच राजकारण्यांसह अधिकाऱ्यांनी या योजनेचा खेळ मांडल्याचेच पाहायला मिळत आहे.

Water Supply
Deepak Kesarkar: अनुदानित शाळांना शासकीयचा दर्जा देणार : दीपक केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.