Dhule News : पाणी गढूळ, पण प्यायला चांगले..! मनपा अभियंत्यांचा दावा; अक्षम्य दुर्लक्षाचा आरोप

Member Sunil Baisane speaking in the standing committee meeting of the Municipal Corporation.
Member Sunil Baisane speaking in the standing committee meeting of the Municipal Corporation.esakal
Updated on

Dhule News : तांत्रिक कारणांनी गेल्या आठ दिवसांत अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेवरून गढूळ पाणीपुरवठा झाला ही वस्तुस्थिती आहे. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य होते, आता गढूळ पाण्याची समस्या नाही.

तसेच तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे, असे स्पष्टीकरण मनपा पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले.(Akkalpada Water Supply Scheme has supplied muddy water in last eight days dhule news)

मात्र, आजही गढूळ पाणीपुरवठा होतोय, शिवाय आमच्या प्रभागात १२ दिवसांपासून पाणी नाही, अशी तक्रार सभापतींसह सदस्याने केली. त्यामुळे पाणीप्रश्‍नी विरोधकांच्या तक्रारी, आरोपांवर सत्ताधाऱ्यांनीच शिक्कामोर्तब केल्याचे चित्र स्थायी समिती सभेत पाहायला मिळाले.

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. ५) सकाळी अकराला महापालिका सभागृहात झाली. सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

सदस्य सुनील बैसाणे यांनी अक्कलपाडा योजनेवरून पाणीपुरवठ्याबाबत खुलाशाची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांनी गेल्या आठ दिवसांत दोनदा अक्कलपाडा योजनेवरील पाइपलाइनचे जॉइंट ओपन झाल्याने गढूळ पाणीपुरवठा झाला ही वस्तुस्थिती आहे.

नवीन पाइपलाइन असल्याने अशा तांत्रिक अडचणी स्वाभाविक आहेत. गढूळ पाणीपुरवठा झाला तरी ते पाणी पिण्यायोग्य होते. आता गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या नाही. शिवाय तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे, असा दावा केला.

Member Sunil Baisane speaking in the standing committee meeting of the Municipal Corporation.
Dhule News : विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञानवाढीसाठी प्रयत्न; निवडक शाळांना सत्तर हजारांवर पुस्तके

अभियंत्यांचा दावा खोडला

कार्यकारी अभियंता सोनवणे यांचा दावा खोडून काढत सभापती श्रीमती कुलेवार यांनी आपल्या प्रभागात गढूळ, रेती-मातीमिश्रित पाणी येत आहे. जलकुंभ ओव्हरफ्लो होतात त्याकडे दुर्लक्ष आहे. पद्मनाभनगर येथे गणपतीनंतर आज पाणी आले, व्हॉल्व्ह बंद होत नाहीत त्यामुळे कमी दाबाने पाणी येते, असे सांगितले.

सदस्य बैसाणे यांनीही फुलेनगर, पद्मनाभनगर भागात बारा दिवसांपासून पाणी नसल्याचे सांगितले. तसेच तांत्रिक कारणांनी काही वेळ गढूळ पाणीपुरवठा होणार हे नागरिकांना का सांगितले नाही, असा सवाल केला.

मराठी शाळा बनल्या मदिरालये

सत्ताधारी भाजप सदस्य हर्षकुमार रेलन यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचा प्रश्‍न मांडला. मनपा शाळा १४ च्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना देऊन महिना झाला, मात्र त्यावर काहीही कार्यवाही नसल्याचे म्हणत संताप व्यक्त केला.

मनपाच्या ऊर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेतील यशाचा दाखला देत त्यांनी या स्पर्धेत ४७ पैकी केवळ दोन विद्यार्थी मराठी माध्यमाचे असल्याचे अधोरेखित करत मराठी माध्यमाच्या शाळेबद्दल आपल्याला आस्था नसल्याचा आरोप केला. ऊर्दू माध्यमाच्या शाळा विद्यालये आहेत आणि मराठी माध्यमाच्या शाळा मदिरालये बनल्याचेही ते म्हणाले.

Member Sunil Baisane speaking in the standing committee meeting of the Municipal Corporation.
Dhule News: धुळेकरांच्या पाणीपुरवठ्यात ‘विघ्नांची मालिका’ सुरूच; तापी पाणीपुरवठा योजनेवरील व्हॉल्व्ह फाटला

लोटगाड्यांचे शहर

शहरातील पेठ भागात प्रत्येक दुकानासमोर लोटगाडी उभी असते, रस्ते ब्लॉक होतात. मात्र, याप्रश्‍नी महापालिका काहीही करत नाही. धुळे शहर लोटगाड्यांचे शहर झालेय, असे श्री. रेलन म्हणाले. लोटगाडीधारकांनाही व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांची पर्यायी व्यवस्था करा, असे त्यांचे म्हणणे होते.

अर्धे शहर अंधारात

एमआयएमच्या सदस्या नाजियाबानो पठाण यांनी अर्धे धुळे शहर अंधारात असल्याचे म्हणत पथदीपांचा प्रश्‍न मांडला. त्यावर सहाय्यक अभियंता एन. के. बागूल यांनी गणेशोत्सवाच्या काळात ३४५ एलईडी दिवे प्राप्त झाले होते, ते गरजेनुसार लावले.

अद्यापही एक हजार दिव्यांची गरज असून, तसे पत्र ठेकेदाराला दिल्याचे सांगितले. श्रीमती पठाण यांनी प्रभागात फवारणी, धुरळणी होत नसल्याचीही तक्रार केली.

दहा लाखांतून कॅनॉल दुरुस्ती

अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्यातून हरणमाळ तलाव भरण्यासाठी कॅनॉल दुरुस्ती करण्यात आली. यासाठी झालेला नऊ लाख ९९ हजार ५९३ रुपये खर्च, मालमत्ता कर भरण्याच्या आवाहनासाठी झालेला दोन लाख २१ हजार २५० रुपये खर्च तसेच सुदर्शन कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या दुरुस्तीवर झालेल्या दोन लाख ९२ हजार ५७५ रुपये कार्योत्तर खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

Member Sunil Baisane speaking in the standing committee meeting of the Municipal Corporation.
Dhule Water Supply News : देवपूर भागास एक दिवस उशिरा पाणीपुरवठा
Member Sunil Baisane speaking in the standing committee meeting of the Municipal Corporation.
Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा 23.68 टक्के साठा; पाणीटंचाईच्या झळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.