नंदुरबार : कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी (Agricultural) विकास योजना या तीनही योजनांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात २०२२-२३
या आर्थिक वर्षांत आजपर्यंत एक हजार ८७४ शेतकऱ्यांना बारा कोटी २४ लाख २८ हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. (Allotment of Rs 12 crore for subsidizing agricultural schemes through the Department of Agriculture nandurbar news)
यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत २०२२-२३मध्ये १ एप्रिल २०२२पासून आजपर्यंत अनुसूचित जातीच्या ६ लाभार्थ्यांना २.२१ लाख, अनुसूचित जमातीच्या १९० लाभार्थ्यांना ८८.०८ लाक, सर्वसाधारणच्या १०४ लाभार्थ्यांना ३९.४६ लाख अशा एकूण तीनशे लाभार्थ्यांना १२९.७५ लाख रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
कृषि यांत्रिकीकरण उपअभियान योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या २६ लाभार्थ्यांना १६.६१ लाख, अनुसूचित जमातीच्या ३३७ लाभार्थ्यांना २२५.३१ लाख, तर सर्वसाधारण गटाच्या ८० लाभार्थ्यांना १८२.१६ लाख असे एकूण ४४३ लाभार्थ्यांना ४२४.०८ लाख रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सर्वसाधारण गटाच्या १ हजार १३१ लाभार्थ्यांना ६७०.४५ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
निकषांमध्ये बदल
यंदापासून (२०२२-२३) कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही बदल केले आहेत. त्यानुसार ट्रॅक्टरचलित औजारांसाठी आर. सी. बुक बंधनकारक राहील. रोखीने खरेदी न करता कॅशलेस पद्धतीने औजारांची खरेदी करणे, पुर्वसंमती अपलोड केलेल्या कोटेशन व रिपोर्टप्रमाणेच औजाराची खरेदी करणे बंधनकारक राहील.
एकाच वर्षात जास्तीत जास्त ३ औजारे किंवा अनुदान रक्कम एक लाखपर्यंत लाभ देण्यात येईल. अनुदानाची रक्कम रुपये एक लाखापेक्षा जास्त असेल, अशा औजारासाठी एका वर्षांत फक्त एकच औजारासाठी अनुदान देय राहील.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किमान सह वर्ष व ट्रॅक्टरचलित औजाराची किमान ३ वर्ष विक्री करता येणार नाही. एक लाखापेक्षा जास्त अनुदान देय असलेल्या यंत्र, औजारांसाठी एकाच कुटूंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड झाली असल्यास कोणत्याही एकाच सदस्यास संबंधीत औजारासाठी अनुदान देय असेल.
मुदतीत लाभ बंधनकारक
लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर अधिकृत विक्रेत्याकडून औजारे, यंत्रांचे दर कोटेशन, टेस्टिंग रिपोर्ट, मागास प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र आदी पोर्टलवर अपलोड करावेत. या कागदपत्रांच्या छाननीनंतर कृषि विभागामार्फत पुर्वसंमती प्रक्रिया पुर्ण होते.
पुर्वसंमती दिल्यानंतर ३० दिवसाच्या आत औजारे व यंत्रे खरेदी करुन बिल अपलोड करणे बंधनकारक आहे. पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्यांची निवड आपोआप रद्द केली जाईल.
"यांत्रिकीकरण औजारे व यंत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने कमी वेळात सर्व प्रक्रिया पार पाडली जात असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत." -मोहन वाघ, नाशिक विभागीय कृषि सहसंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.