Ambedkar Jayanti 2023 : डॉ. आंबेडकरांच्या 132 मूर्तींचे वितरण

Distribution of 132 idols of Dr Ambedkar to Ambedkar followers
Distribution of 132 idols of Dr Ambedkar to Ambedkar followers esakal
Updated on

Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिल परिसरातील ईखे नगरमध्ये श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान व बहुजन समाज उन्नती मंडळातर्फे शुक्रवारी (ता. १४) कार्यक्रम झाला. यात आंबेडकरी अनुयायांना डॉ. आंबेडकरांच्या १३२ मूर्तींचे वितरण झाले. (Ambedkar Jayanti 2023 Distribution of 132 idols of Dr Ambedkar to Ambedkar followers dhule news)

ईखेनगरमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली. श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र शेलार आणि भाजपचे नगरसेवक अमोल मासुळे यांनी अनोख्या उपक्रमातून डॉ. आंबेडकरांच्या मूर्तीरूपी प्रतिमेचे वितरण केले.

खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, रवी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, ज्येष्ठ एम. जी. धिवरे, मनपा स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, माजी सभापती सुनील बैसाणे, नगरसेविका योगिता बागूल, शिवाजीराव चौधरी, अ‍ॅड. गोपी धिवरे, प्रदीप पानपाटील, प्रा. सागर चौधरी, सनी चौधरी, किरण चौधरी, बापू खरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Distribution of 132 idols of Dr Ambedkar to Ambedkar followers
Nashik News : महापालिकेच्या मोकळे भूखंड बचतगटांसाठी : आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमांचे पूजन झाले. सामूहिक बुद्धवंदना झाली. नंतर १३२ मूर्तींचे वितरण झाले. वाल्मीक जाधव यांनी सूत्रसंचालन केले. दीपक साळवे, गोविंद वानखेडे, महेंद्र सोनवणे, भटू वानखेडे, कमलाकर बिराडे, अजय सरदार, जिभाऊ खरात, शशिकांत जाधव, गौतम देवरे, उत्तम अहिरे, अर्जुन जाधव, विष्णू त्रिभुवन,

दिलीप गढवे, सुकलाल गरुड, वसंत जाधव, संजय शेजवे, सिद्धार्थ बागले, श्रीराम आखाडे, प्रशांत आखाडे, गोपाल आखाडे, मनोज ईशी, गणेश ईशी, देवेंद्र मैराळे, नीलेश शेजवे, नरेंद्र गायकवाड, विलास बच्छाव, सचिन वेंदे, चेतन महिरे, सुरेश सपकाळे, गुलाब सरदार, दीपक मैराळे आदींनी सपत्नीक बुद्धवंदना सादर करत डॉ. आंबेडकरांची मूर्ती स्वीकारली.

अजय सरदार, अर्जुन जाधव, पवन अहिरे, दीपक साळवे, राम बैसाने, सचिन बिराडे, भूषण खरात, जिभाऊ खरात, शशी जाधव, प्रतिष्ठानचे चंद्रकांत पाटील, अमोल पुकळे, भय्या पाटील, गोविंदा सोनवणे, पिंटू चव्हाण, नितीन आखाडे, बबलू सूर्यवंशी, मनोज सरगर, मुकेश थोरात, रितिक वाघ आदींनी संयोजन केले..

Distribution of 132 idols of Dr Ambedkar to Ambedkar followers
Dhule News : राज्य माहिती आयोगाचा धुळे महापालिकेला दणका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.