Dhule BJP News : शहर-जिल्हाध्यक्षपदी अंपळकर; भाजपकडून नियुक्ती

 BJP
BJPesakal
Updated on

Dhule BJP News : भाजपच्या शहर- जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र अंपळकर, तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शिरपूरचे बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने ही नियुक्ती झाली. मावळते शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने हे फेरबदल झालेत. (Ampalkar appointed as BJP city district president dhule news)

काही महिन्यांपासून भाजपमध्ये नूतन शहर-जिल्हाध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरू होती. श्री. अंपळकर हे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे कट्टर समर्थक आहेत. तळागाळातील सामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाशी भिडणारा, जनतेत मिसळून काम करणारा कार्यकर्ता अशी श्री. अंपळकर यांची ओळख आहे.

त्यांनी हर हर महादेव विजय व्यायामशाळेच्या माध्यमातून नामांकित पहिलवान घडविले आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. चौधरी १९८० पासून भाजपशी एकनिष्ठ आहेत. ‘आरएसएस’चे स्वयंसेवक ते १९८३ ते १९८७ यादरम्यान भाजयुमोर्चाचे शिरपूर शहराध्यक्ष राहिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 BJP
Dhule News : दहिवदला नाल्याच्या बाजूला होतात अंत्यसंस्कार

त्यांनी जिल्हा चिटणीस, शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, नाशिक विभागीय म्हाडा उपसभापती, प्रदेश उपाध्यक्ष, शिरपूर साखर कारखाना व शिरपूर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष, नंदुरबार जिल्हा प्रभारीपदाची धुरा सांभाळली आहे.

सक्षम, क्रियाशील आणि संघटनात्मक कौशल्य असल्याने श्री. चौधरी यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. भाजपच्या मन की बात विभाग व बूथरचना विभागाचे ते विभागीय संयोजक आहेत.

 BJP
Maharashtra BJP : निवडणुकीची तयारी सुरू झाली, महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.