धुळे : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल आणि शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचीच बांधकामविषयक फाइल अधिकाऱ्यांनी पेंडिंग ठेवल्याचा गंभीर प्रकार बैठकीत समोर आला.
या प्रमुखांचीच ही स्थिती तर सर्वसामान्यांचे काय हाल केले जात असतील, अशा शब्दात महापौरांसह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. तसेच महापालिकेत मंगळवारी (ता. २६) झालेल्या संयुक्त बैठकीत शहरातील विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. (Amrishbhai patel anup Agrawal Construction file pending by dhule municipal corporation officers dhule latest Marathi news)
गेल्या आठवड्यापासून ‘सकाळ’ने विशेष मालिकेद्वारे महापालिकेच्या कारभारातील उणिवांची मांडणी केली. त्यावर सत्ताधारी भाजपनेही मंगळवारी (ता. २७) झालेल्या संयुक्त आढावा बैठकीत शिक्कामोर्तब केला.
बांधकाम परवानगीचे प्रस्ताव असो की अन्य दुसरे विकास काम असो. त्यात अधिकारी क्षुल्लक कारणावरून त्रुटींची नोंद करतात आणि कामांमध्ये खोडा घालतात. विकास कामाच्या फाइल्स हेतुतः अडविल्या जातात.
ज्या कामांमधून महापालिकेच्या तिजोरीत निधी येणार आहे, ती कामेदेखील विनाकारण अडवून ठेवली जातात. त्यामागील हेतू काय, असा मौलिक प्रश्न उपस्थित करीत सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीची पोलखोल केली.
बैठकीत २४ समस्यांवर आढावा
बैठकीतील २४ समस्यांवर आठवड्यात मार्ग काढला नाही, तर अधिकाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापौर प्रदीप कर्पे यांनी दिला.
भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, आयुक्त देविदास टेकाळे यांची प्रमुख उपस्थित होती. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, एलईडी पथदिवे बसविणे, घनकचरा व्यवस्थापन व संकलन, आरोग्य विभागामार्फत फवारणी, शासकीय
योजनांमधील मनपाचा हिस्सा देणे, अतिक्रमण निर्मूलनातील अडचणी सोडविणे, नगरसेवक निधीमधील प्रस्तावित कामांची तरतूद, प्रलंबित बांधकाम मंजुरी प्रस्ताव, मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त, बीओटी तत्त्वावरील प्रकल्प व प्रस्तावाची कार्यवाही, हद्दवाढ गावातील घरपट्टी आकारणी व विकास कामे, थकीत पाणीपट्टी वसुली, बालवाडी शिक्षिकांचे प्रलंबित प्रस्ताव, मनपा इमारतीच्या चौथ्या टॉवरचे बांधकाम, देवपूरमधील रस्त्यांप्रश्नी प्रस्ताव शासनाला सादर करणे, वित्त आयोगातून जोरावर अली सोसायटी, जगदीश नगर, अजय नगर, वरखेडी येथे जलकुंभांचे बांधकाम, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, भुयारी गटार योजनेबाबत पुढील कार्यवाही, वृक्षारोपण, कायम कर्मचारी पदोन्नती प्रस्ताव, तांत्रिक पदे मानधनावर नियुक्त करणे आदी विषय मार्गी लावण्याची अधिकाऱ्यांना सूचना झाली.
भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा
देवपूरमध्ये भाजी विक्रेत्यांनी भररस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागा शिल्लक ठेवली नाही.
त्यासाठी अतिक्रमण विभागाचे प्रसाद जाधव यांना चार दिवसात अतिक्रमण काढण्याचा आदेश महापौरांनी दिला. देवपूरसह पेठ भागातील व्यावसायिकांना पांझरा नदीकाठच्या रस्त्यांलगत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना श्री. अग्रवाल यांनी दिली.
पाणीप्रश्नी रिक्त पदे भरा
पावसाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने महापौरांनी संताप व्यक्त केला. अभियंता चंद्रकांत उगले म्हणाले, मुबलक जलसाठा असला तरी नियोजन कोलमडले आहे. विभागात रिक्त पदे
असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. वेळोवेळी मागणी करूनही समस्या मार्गी लागत नाही. त्यामुळे कंत्राटी पदे भरण्यासाठी निविदा काढण्याची सूचना महापौरांनी दिली. नागरिक रोज विविध तक्रारी करतात.
अधिकाऱ्यांच्या बेजाबदारपणामुळे आम्हाला जनतेला तोंड द्यावे लागते. डासांमुळे रहिवासी त्रस्त आहेत. तरीही फवारणी करावीशी वाटत नाही, अशी संतप्त भावना बैठकीत उमटली. माजी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर अनिल नागमोते, स्थायी समिती
सभापती शीतल नवले, सभागृह नेता राजेश पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना बागूल, माजी सभापती सुनील बैसाणे, माजी विरोधी पक्ष नेता साबीर शेट, अमोल मासुळे, अरुण पवार, किरण अहिरराव, वसीम बारी, प्रवीण अग्रवाल, प्रा. सागर चौधरी, इतर नगरसेवकांसह अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त संगीता नांदुरकर, शिल्पा नाईक, अभियंता कैलास शिंदे, नगरसचिव मनोज वाघ, आरोग्याधिकारी डॉ. जे. सी. पाटील, नगररचनाकार भटू पवार आदी उपस्थित होते. बैठकीत हर घर तिरंगा अभियानाबाबत चर्चा झाली.
अनुप अग्रवाल यांचा संताप
भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी १७ लाख रुपये भरून दोन महिने झाले तरी अद्याप बांधकाम परवानगी मिळालेली नाही, कायदेशीर पूर्तता आणि पैसे भरूनही आमच्या सारख्यांना हा अनुभव, तर सर्वसामान्यांना काय अनुभव येत असावा याची कल्पनाच केलेली बरी असे म्हणत संताप व्यक्त केला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.