Nandurbar News : माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी अनिलचे मदतीचे आवाहन

Climber Anil Vasave
Climber Anil Vasaveesakal
Updated on

धडगाव (जि. नंदुरबार ): बालाघाट (ता. अक्कलकुवा) आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे याची माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी निवड झाली आहे. अनिलला आदिवासी विकास विभागामार्फत मदत करण्यात आली आहे. (Anil appeal for help for the Mount Everest expedition nandurbar news)

मात्र, त्याला ३५ लाख रुपये एवढी मोठी रक्कम माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी लागणार आहे. विविध कंपनी आणि संस्था यांच्याकडून तो मदतीसाठी प्रयत्न करत आहे. अनिलच्या या एव्हरेस्ट मोहिमेसाठी दानशूरांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे. अनिलने ही एव्हरेस्ट मोहिम फत्ते केली तर तो खानदेशचा पहिला एव्हरेस्टवीर ठरणार आहे.

अनिल हा मूळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा विद्यार्थी असून माउंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होणार आहे. या मोहिमेला ७ एप्रिलला सुरवात होणार आहे. ही मोहिम ७ जूनपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

Climber Anil Vasave
Nashik Crime News : 1 मिनिटांचा ब्रेक पडला महागात; मोबाईलसह दुचाकी पळविली

अनिलने आतापर्यंत आफ्रिका खंडांतील सर्वात उंच शिखर किलिमांजारो आणि युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माउंट एलब्रुस या शिखरावरील मोहिम फत्ते केलेल्या आहेत. अनिलने माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिम देखील यशस्वीपणे पार पाडली आहे. अशी कामगिरी करणारा अनिल हा पहिला आदिवासी युवक आहे. अनिलने उत्तराखंड येथे आयोजित सतोपंथ मोहीमही यशस्वी केली.

एव्हरेस्ट सर करण्याचे माझे स्वप्न आहे. माझा समाज व जिल्ह्माचे तसेच राज्य आणि देशाचे नाव उंचाविण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. ही मदत मला कुणी उधारीने दिली, तरी स्वप्न साकारल्यानंतर ती मी कुठलेही काम करून फेडू, त्यासाठी स्वत:ला गहाण ठेवण्याची माझी तयारी आहे - अनिल वसावे, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक, बालाघाट, ता. अक्कलकुवा.

Climber Anil Vasave
Nandurbar News | लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हक्कांची जबाबदारी स्वीकारावी : चंद्रकांत रघुवंशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.