Dhule News : धार्मिक पर्यटनस्थळास 3 कोटी : अनुप अग्रवाल

Anup Agrawal
Anup Agrawal esakal
Updated on

Dhule News : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत यंदा धार्मिक पर्यटनस्थळांसंबंधी कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याकामी तीन कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती भाजपचे शहर विधानसभा मतदारसंघप्रमुख अनुप अग्रवाल यांनी दिली.

ते म्हणाले, की जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत यंदा विविध कामे मंजूर झाली असून, या कामांना तांत्रिक मान्यतेचा आदेश प्राप्त झाला आहे. (Anup Agarwal statement of 3 crore for religious tourism dhule news)

त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांना पत्र देऊन या कामांचे सक्षम अधिकाऱ्यांच्या तांत्रिक मान्यतेसह सविस्तर अंदाजपत्रके व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. या निधीतून महापालिकेच्या माध्यमातून तीन कोटींची कामे केली जाणार आहेत.

अशी होतील कामे

महापालिका हद्दीतील अवधान येथे श्री धनदाईमाता मंदिर परिसरात रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविणे, भिंत व संरक्षक भिंत बांधकामासाठी सव्वा कोटी रुपये, अवधान शिवारातील श्री महादेव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपये, श्री गजानन महाराज मंदिर येथील उद्यानाचे बांधकाम, रस्ते, भिंत, पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामांसाठी सव्वा कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

Anup Agrawal
Dhule News : सातपुड्यातील हजारो लोकांना ‘गजनी’ने बनविले शाकाहारी; अंगावरील कपड्यांद्वारे संदेश

यातून शहरातील ही धार्मिक पर्यटनस्थळे विकसित होणार आहेत. सौंदर्यात भर पडणार आहे. याकामी शासनासह पर्यटनमंत्री, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे श्री. अग्रवाल यांनी आभार मानले.

Anup Agrawal
Dhule News: महापालिकेच्या व्यापारी संकुलाचा मार्ग मोकळा; साडेसात एकरची कोट्यवधींची जागा लाटण्याचा डाव उधळला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.