Dhule News : गोंदूरची ‘सून’निर्मित फुलहार रामलल्लासाठी थेट अयोध्येला! धुळ्यासह नाशिकचे नाव थेट अयोध्येत

अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवेळी म्हणजे सोमवारी (ता. २२) ही फुलमाळ घातली जाणार आहे.
necklace made by Anushka Bhadane for the idol of Sri Rama in Ayodhya. In the second photo, Phulhar.
necklace made by Anushka Bhadane for the idol of Sri Rama in Ayodhya. In the second photo, Phulhar.esakal
Updated on

कापडणे : गोंदूर (ता. धुळे) येथील सूनबाईंनी बनविलेला विशेष फुलहार थेट अयोध्या पोचला आहे. विविध रंगांच्या फुलांना कलेद्वारे आगळेवेगळे रूप देणाऱ्या ‘फ्लोरल आर्ट बाय अनुष्का’च्या संचालिका अनुष्का भदाणे यांनी श्रीरामलल्लासाठी हा हार पाठविला आहे.

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असता काळाराम मंदिरातील श्रीरामासाठी साज व माळा भदाणे यांनीच बनविली होती. गोंदूरच्या सुनेचे नाव आता दूरवर जगभर पोचले आहे. या कामगिरीने खानदेशवासीयांची मान उंचावली आहे. (Anushka Bhadane director of Floral Art by Anushka sent flower necklace for Sriram Lalla ayodhya ram mandir dhule)

अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवेळी म्हणजे सोमवारी (ता. २२) ही फुलमाळ घातली जाणार आहे. विविध फुलांचे हार बनविण्यासाठी सहा ते सात तास लागल्याचे भदाणे यांनी सांगितले.

यासाठी थायलंड, श्रीलंका आणि भारतीय कलेचा मेळ साधत फुलमाळ बनविली आहे. बटण शेवंतीच्या दोन रंगांची आणि दगरची फुले यासाठी वापरली आहेत.

भारतीय विणकामाची कलाकुसर वापरली आहे. यासाठी पाटील यांनी चार आर्टिस्टचीही मदत घेतली आहे.

necklace made by Anushka Bhadane for the idol of Sri Rama in Ayodhya. In the second photo, Phulhar.
Ayodhya Ram Mandir : दक्षिण मध्य रेल्वेतर्फ 4 फेब्रुवारीला मराठवाड्यातून अयोध्येसाठी विशेष रेल्वे

दरम्यान, नुकतेच नाशिकमध्ये काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले. त्या वेळी ते फुलांची सजावट व फुलहार बघून प्रभावित झाले.

‘फ्लोरल आर्ट बाय अनुष्का’च्या अनुष्का भदाणेर्मित तुळशीच्या हाराने अधिक प्रभावित केले होते. ‘फ्लोरल आर्ट बाय अनुष्का’चा नाशिकपासून सुरू झालेला प्रवास जगभर पोचला.

नाशिकस्थित गोंदूरच्या सूनबाई

गोंदूर येथील युवा उद्योजक स्वप्नील भदाणे नाशिकस्थित आहेत. गोंदूर येथेही उद्योग-व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी अनुष्का भदाणे डिझायनर आहेत. त्यांना काळाराम मंदिराच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध झाली आहे.

necklace made by Anushka Bhadane for the idol of Sri Rama in Ayodhya. In the second photo, Phulhar.
Dhule News : रहीमपुरेचे नामकरण आता रामनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.