Diploma Veterinary Science : पशुचिकित्साशास्त्र पदविका अभ्यासक्रमावर शिक्कामोर्तब!

Revenue and Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil along with senior officials present at the meeting regarding Diploma in Veterinary Science course
Revenue and Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil along with senior officials present at the meeting regarding Diploma in Veterinary Science course esakal
Updated on

Diploma Veterinary Science : बारावीनंतर तीन वर्षे कालावधीचा पशुचिकित्साशास्त्र पदविका अभ्यासक्रम सुरू करावा या गेल्या ३० वर्षांपासूनच्या मागणीवर महसूल व पशुसंवर्धनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती भारतीय पशुचिकित्सा सेवा महासंघाचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. संजय पाटील, पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रमण गावित यांनी दिली. (Approval of decision to start Diploma in Veterinary Science dhule news)

गुरुवारी (ता. २२) पुणे येथे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस प्रधान सचिव पदुम, पशुसंवर्धन आयुक्त, पशुमत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू, अधिष्ठाता, पशुचिकित्सा परिषदेचे निबंधक, डेअरी डिप्लोमा चालविणाऱ्या संस्थाचालकांचे प्रतिनिधी, राजपत्रित पशुवैद्यकीय अधिकारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. सुनील काटकर, राज्य सचिव मारुती कानोले, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, भारतीय पशुचिकित्सा सेवा महासंघाचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. संजय पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेतर्फे डॉ. पाटील व डॉ. कानोले यांनी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Revenue and Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil along with senior officials present at the meeting regarding Diploma in Veterinary Science course
Dhule News : जि.प. शाळेची दगडी भिंत शालेय वेळेत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट

त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या हितासाठी व प्रभावी सेवेसाठी आधुनिक ज्ञानाने सक्षमपणे सेवा देणारा तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या तांत्रिक सहाय्यकांचे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी बारावी विज्ञाननंतरचा तीन वर्षांचा पशुचिकित्सा शास्त्राचा पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घोषणा केल्याचे संघटनेने म्हटले आहे.

हा अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण, आमदार मंजुळा गावित, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल कुल, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार फारुख शहा यांच्यासह अनेक आमदारांनी प्रयत्न केले होते. या निर्णयामुळे बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नवीन संधी निर्माण झाल्याचे संघटनेतर्फे डॉ. पाटील, डॉ. गावित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Revenue and Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil along with senior officials present at the meeting regarding Diploma in Veterinary Science course
Dhule BJP News : आम्ही एकाच परिवाराचे सदस्य! भाजपची अनोखी डबा पार्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.