Nandurbar News : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांना मंजुरी

Nandurbar: In the hall of the municipal opposition party leaders in the new administrative building, the opposition leader Adv. Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi, corporator Anand Mali, Gaurav Chaudhary etc. while welcoming Charudatta Kalvankar and taking his seat with honor.
Nandurbar: In the hall of the municipal opposition party leaders in the new administrative building, the opposition leader Adv. Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi, corporator Anand Mali, Gaurav Chaudhary etc. while welcoming Charudatta Kalvankar and taking his seat with honor.esakal
Updated on

नंदुरबार : नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २०) सकाळी अकराला नूतन प्रशासकीय इमारतीमधील लोकनेते माणिकराव गावित सभागृहात नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी विषयपत्रिकेवरील विविध विकासकामांचा समावेश असलेल्या १२ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, पालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ २३ डिसेंबरला पूर्ण होत असल्याने ही सभा नगराध्यक्षा व नगरसेवकांसाठी निरोप समारंभ ठरली. या वेळी सत्ताधारी व विरोधी भाजपच्या नगरसेवकांचा पालिकेतर्फे सत्कार करून गौरव करण्यात आला. (Approval of development works in general meeting of Municipal Corporation Jalgaon News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Nandurbar: In the hall of the municipal opposition party leaders in the new administrative building, the opposition leader Adv. Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi, corporator Anand Mali, Gaurav Chaudhary etc. while welcoming Charudatta Kalvankar and taking his seat with honor.
Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये चुरशींच्या लढतींत कही खुशी कही गम!

सभेत मंजुरी देण्यात आलेले विषय असे

मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पाणीपुरवठा विभागातील सुरू असलेल्या विविध कामांसाठी मुदतवाढ मिळण्याकामी आलेल्या अर्जावर विचारविनिमय करणे, सर्व्हे क्रमांक २७४, २७५ मधील समर्थ मंगलतीर्थनगरमधील पाइपलाइन टाकणेकामी होणाऱ्या अदमासे खर्चास मंजुरी देणे, मृत कर्मचारी श्रीमती कविता देवराम वळवी यांची वारस मुलगी मनीषा भानुदास गावित यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणे प्रस्तावास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठविणेबाबत विचारविनिमय करणे, घनकचरा व्यवस्थापनात आयसीटी प्रणालीचा वापर करण्याकामी शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करणे, माळीवाडा परिसरातील जुना कोंडवाडा जागेत व्यापारी संकुल उभारणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय निर्णयान्वये नंदुरबार पालिका हद्दीतील वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यास मंजुरी देणे, पायलनगर, १, २ मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे व इतर १२ कामांच्या अंदाजपत्रकास व निविदाप्रक्रिया करण्यास मंजुरी देणे, सफाई कामगार जसोदा संतोष मेहत्तर निवृत झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर त्यांची सून पूनम बंटी ढंढोरे यांना वारसाहक्काने पालिका सेवेत सामावून घेण्यासाठी आलेल्या अर्जावर निर्णय घेणे, सर्व्हे क्रमांक ४१ मधील आ.क्र. १६ खालील तसेच शेती विभागातील जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यासाठी पालिकेने घेतलेल्या निर्णयास अंतिम मंजुरी देणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील नादुस्त यंत्रणा दुरुस्त करणे, सर्व्हे क्रमांक ४२१ चे क्षेत्र शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणे व विवित मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने मुदतवाढ मिळणे आदी विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.

नूतन प्रशासकीय इमारतीत तयार करण्यात आलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात मंगळवारच्या सभेनंतर शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधी गटाचे भाजपचे नेते ॲड. चारुदत्त कळवणकर यांना दालनात नेत त्यांच्या कार्यकाळात दालनात त्यांना बसण्याचा हक्क असल्याने त्यांना बसविण्यात आले. विरोधी गटनेते म्हणून दालनात त्यांचा सत्कारही करण्यात आला.

Nandurbar: In the hall of the municipal opposition party leaders in the new administrative building, the opposition leader Adv. Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi, corporator Anand Mali, Gaurav Chaudhary etc. while welcoming Charudatta Kalvankar and taking his seat with honor.
Mahavitaran March : महावितरण कर्मचार्यांचा १८ किलोमीटर मोर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.