Dhule Crime : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद; तरुणाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण

Beating
Beatingesakal
Updated on

Dhule Crime : दलवाडे (प्र. सोनगीर, ता. शिंदखेडा) येथे रविवारी (ता. ११) रात्री दहाच्या सुमारास आदिवासी वस्तीत हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याचा कारणावरून पिंप्री (ता. शिंदखेडा) येथील २१ वर्षीय तरुणाला चिमठाणे येथील दहा तरुणांनी लोखंडी फाइटरने व लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून गैरकायद्याची गर्दी जमविल्याचा गुन्हा सोमवारी (ता. १२) शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. (Argument over dancing in Haldi program youth was beaten up dhule crime news)

दलवाडे येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम असल्याने चिमठाणे व पिंप्री येथील तरुण नाचण्यासाठी गेले असता नाचताना किरण भिल यांचा करण सोनवणे यास धक्का लागल्याने ते सांगितल्याचा राग आल्याने किरण गबा भिल, रावसाहेब सदू भिल, महेंद्र रन्या भिल, मुकेश रंज्या भिल, दादू अनिल भिल, मुकेश भिवा भिल, दिनेश भिल (पूर्ण नाव माहिती नाही), अजय जंगू भिल, अनिल भुरा पावरा व राकेश गबा भिल (सर्व रा. बेलापूर, चिमठाणे) यांनी लोखंडी फायटर व लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याची फिर्याद करण भाईदास सोनवणे (वय २१, रा. पिंप्री) याने शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Beating
Nashik Crime: प्रसूतीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन; सातपूरच्या मायको हॉस्पिटलमधील प्रकार

दहा तरुणांविरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून करण सोनवणे व त्याचे मामा किरण सुभाष मोरे यांना डोक्यावर तोंडावर, पाठीवर, कपाळावर लोखंडी फायटरने तसेच लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून दुखापत केली तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करून ठार करण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सदेसिंग चव्हाण तपास तपास करीत आहेत.

Beating
Karad Crime : यात्रेतलं मांसाहारी जेवण पडलं महागात; 25 जणांना विषबाधा, 'इतक्या' जणांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.