Dhule Rain Update : शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथे दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. (Arrival of rains in Holnanthe dhule rain update news)
अखेर गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वरुणराजाचे आगमन झाले व शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण दिसून आले. अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा लागून होती.
अखेर वरुणराजाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. वातावरणातील प्रचंड तापमानामुळे शेतीकामांना खीळ बसली व पिकांना पाणी देणेदेखील जिकिरीचे होत होते. आजच्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शेतीपंपांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. मात्र या प्रश्नाकडे कोणीही लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही.
होळनांथे येथील सबस्टेशनवर अधिकचा भार असल्यामुळे गावठाण व शेतीपंपांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा करणे अशक्य होत आहे. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून, मशागतीच्या कामांना गती प्राप्त होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.