Dhule Accident News : कारच्या धडकेत कलाशिक्षक राजेंद्र सूर्यवंशी ठार

rajendra suryawanshi
rajendra suryawanshiesakal
Updated on

Dhule Accident News : तालुक्यातील नवलाणे येथील रहिवासी व बोरगाव (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथील धैर्यशील पवार माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले कलाशिक्षक राजेंद्र तोताराम सूर्यवंशी (वय ४१) यांचे सोमवारी (ता. १६) अपघाती निधन झाले.

राजेंद्र सूर्यवंशी कामानिमित्त नवलाणे गावी आले होते.(Art teacher Rajendra Suryawanshi was dead in car accident dhule news)

काम आटोपून नोकरीच्या ठिकाणी बुलेटवर परत जाताना देवळा तालुक्यातील चिंचावड-निंबोरा रस्त्यावर शिव नाल्याजवळ इको कारने धडक दिली. यात कलाशिक्षक सूर्यवंशी यांच्या छातीला जबर मार बसला.

त्यांनी हेल्मेट परिधान केलेले असूनही रक्तस्राव झाल्याने जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवळा पोलिस तपास करीत आहेत.

प्रतिभावान, आदर्श कलाशिक्षक म्हणून राजेंद्र सूर्यवंशी यांचा अनेक ठिकाणी गौरव झाला होता. त्यांनी शाळेतील प्रदर्शनीय फलकावर वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान सण-उत्सवाचे व महापुरुषांचे खडूने केलेली रेखाटन चित्रे अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती.

rajendra suryawanshi
Dhule Accident News : सोनगीर येथे आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

त्यांच्या मागे आई, पत्नी मीनाबाई, मुले निखिल व धीरज, गावी शेती करणारे लहान भाऊ देवीदास व शिवदास सूर्यवंशी असा परिवार आहे. मंगळवारी (ता. १७) दुपारी त्यांच्यावर नवलाणे गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वेळी मोठ्या संख्येने शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. नवलाणे गावात एकही चूल पेटली नाही.

rajendra suryawanshi
Dhule Accident News : आयशरच्या धडकेत बभळाज येथे दोघे ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()