Dhule Highway News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण करत असताना साक्री शहरातील महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता बाह्यवळण रस्ता (बायपास रस्ता) करण्यात आला.
हा रस्ता धुळ्याकडून दहिवेल, सुरतच्या दिशेने जात असताना शेवाळी फाट्यापासून थेट साक्री शहराबाहेरून कावठे फाट्यापर्यंत नेण्यात आला आहे.
मात्र या ठिकाणी जुन्या आणि नव्या रस्त्याला जोडण्यासाठी अद्यापपर्यंत ना पक्का रस्ता, ना सर्कल, ना अन्य काही ठोस व्यवस्था करण्यात आल्याने दहिवेलकडून साक्री शहरात येणाऱ्या वाहनधारकांची मोठी तारांबळ होते. यातून अनेक वेळा अपघातदेखील होत आहेत. (As no other concrete arrangements have been made there is huge rush of motorists coming from Dahivel to Sakri town dhule news)
महामार्ग चौपदरीकरण करत असताना साक्री शहराला बाह्यवळण रस्ता (बायपास रस्ता) करत असताना पूर्वेला शेवाळी फाटा येथून व पश्चिमेला कावठे फाटा येथून जुना रस्ता वळवून तो नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याला जोडण्यात आला आहे.
यामुळे शेवाळी फाटा येथे सुरक्षिततेच्या कुठल्याही उपाययोजना नसलेले सदोष वाहतूक बेट तयार झाले, मात्र पश्चिमेकडील कावठे फाट्यानजीक अशी कुठलीच व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना शहरात प्रवेश करण्यासाठी जुन्या मार्गावर जायचे कसे, याचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
दोन रस्त्यांना जोडायला कच्च्या रस्त्याचा आधार
साक्री हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने दहिवेल आणि परिसरातील अनेक गावांतील नागरिक दैनंदिन कामानिमित्त साक्री शहरात नेहमी ये-जा करतात. याशिवाय अन्य शेकडो वाहने दररोज या मार्गाने शहराकडे येत असतात. असे असताना या महत्त्वाच्या मार्गावर नव्या आणि जुन्या रस्त्याला जोडणारी कुठलीच ठोस व्यवस्था अद्यापपर्यंत नसणे हे अतिशय गंभीर आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या ठिकाणी महामार्गावर केवळ एक दुभाजक असून, नव्या रस्त्यातून जुन्या रस्त्याकडे जाण्यासाठी केवळ माती-मुरूम टाकून शेतशिवारात करावा तसा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत असून, अनेक वाहनचालकांना हा कच्चा रस्ता दिसून येत नसल्याने ते थेट शेवाळी फाट्यापर्यंत पोचतात व तिथून पुन्हा माघारी फिरून शहरात येतात.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा अतिशय वर्दळीचा आणि महत्त्वाचा असताना त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात या गंभीर चुका दिसून येत असल्याने या सर्व चुका अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत.
कावठे फाट्याच्या या नव्या-जुन्या रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी गेल्या महिन्यातच एकाच वेळी दोन खासगी बस आल्याने या बसचा अपघात झाला होता. यांसारख्या अपघाताच्या लहान-मोठ्या घटना सातत्याने घडत असताना याकडे गांभीर्याने लक्ष न दिले गेल्याने यावर अद्याप कुठलाही मार्ग निघू शकलेला नाही.
"दहिवेलकडून साक्री शहरात येत असताना या ठिकाणी नव्या-जुन्या रस्त्यांना जोडण्यासाठी गोंधळात टाकणारा असा कच्चा रस्ता असून, तो अतिशय धोकादायक आहे. या ठिकाणी सुरक्षित उपाययोजना केली जावी." -भूषण बोरसे, कावठे, ता. साक्री
"महामार्ग चौपदरीकरण करत असताना वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. कावठे फाट्याजवळ नव्याने करण्यात आलेला महामार्ग आणि साक्री शहरात येणारा जुना रस्ता यांना जोडण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीचा पर्याय देण्यात आला असून, या ठिकाणी किमान वाहतूक बेट, अंडर पास किंवा अन्य सुरक्षित उपाययोजना करण्याची गरज आहे." -ॲड. नरेंद्र मराठे, साक्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.