धुळे : सर्व वाहनधारकांनी आपले वाहन संगणकीय प्रणालीवर (Computer system) स्वत:च्या मोबाईल क्रमांकासह (Mobile Number) नोंदवून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Assistant Regional Transport Officer) राहुल कदम यांनी केले. (Assistant Regional Transport Officer Rahul Kadam statement About vehicle registration dhule news)
वाहनाच्या सर्व कामकाजाबाबत संगणकीय प्रणाली कार्यान्वित आहे. वाहनांच्या सर्व संगणकीय अर्जासंबंधी वाहन मालकाच्या कार्यालयीन अभिलेखावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होतो. त्यानंतर हा अर्ज पूर्ण होतो. यामध्ये सर्व वाहनधारकांनी त्यांचा स्वत:चाच मोबाईल क्रमांक या कार्यालयाच्या अभिलेखावर नोंद आहे किंवा कसे याची खात्री करून घ्यावी. मोबाईल क्रमांक नोंद नसेल, तर आपला मोबाईल क्रमांक, आधार कार्डची अद्ययावत छायांकित प्रत जोडून अर्ज करावा. त्यामुळे योग्य मोबाईल क्रमांक संगणकावर नोंदवला जाईल. वाहनाबाबत होणाऱ्या गैरप्रकारास आळा बसेल.
अनेक वाहने ही संगणकीय प्रणालीपूर्वी नोंद झालेली आहेत. त्यांची संगणकीय नोंद घेणे गरजेचे आहे. यामध्ये हस्तलिखित अभिलेख असल्यामुळे आपले नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून व मिळती-जुळती सही करून कामकाज केले जाऊ शकते. यामध्ये सही तपासणे ही प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची जबाबदारी नाही. तसेच अनेक वाहनधारक हे वाहन विक्री करताना सर्व वाहनाचे कागदपत्रे व अर्ज सह्या करून देतात. त्यानंतर आर्थिक रक्कम प्राप्त न झाल्यास तक्रार करून वाहनाचे कामकाज न करण्याबाबत अर्ज देतात. या कार्यालयाचे कामकाज मोटार वाहन कायद्यानुसार प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे असून वाहन विक्री, आर्थिक व्यवहाराबाबत जबाबदारी या कार्यालयाची नाही, असेही श्री. कदम यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.