Nandurbar News : सुरत-अयोध्या आस्था एक्स्प्रेसवर नंदुरबार परिसरात दगडफेकीची तक्रार

गुजरातमधून अयोध्या येथे जाणाऱ्या आस्था स्पेशल ट्रेनवर रविवारी रात्री १०.४५ च्या सुमारास नंदुरबारनजीक दगडफेक करण्यात आली.
Astha Express (file photo)
Astha Express (file photo) esakal
Updated on

Nandurbar News : गुजरातमधून अयोध्या येथे जाणाऱ्या आस्था स्पेशल ट्रेनवर रविवारी रात्री १०.४५ च्या सुमारास नंदुरबारनजीक दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, रेल्वे पोलिस बलाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, केंद्रीय मंत्री दर्शनाबेन जरदोश यांनी सुरतहून अयोध्या येथे जाणाऱ्या आस्था ट्रेनला रात्री आठच्या सुमारास हिरवी झेंडी प्रारंभ केला. (Astha Special train from Gujarat to Ayodhya was pelted near Nandurbar news)

अयोध्येकडे निघालेली ही विशेष रेल्वे नंदुरबारजवळ पोचताच रात्री पावणेअकराच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. त्यामुळे गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. त्यांनी तातडीने ट्रेनचे दरवाजे बंद केले होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

दरम्यान, ज्या ठिकाणी दगडफेकीची घटना घडली, तिथे एक संशयित मनोरुग्ण व दुसरा दारूच्या नशेत आढळला. यातील मनोरुग्णाला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे घटनेबाबत संभ्रम आहे.

याबाबत रेल्वे पोलिस बलाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

Astha Express (file photo)
Solapur Crime News : पुणे, सांगली, सोलापुरातील दुचाकी चोरणारा जेरबंद; चोरट्याकडून पाच दुचाकी हस्तगत

या ट्रेनमध्ये एकूण एक हजार ३४० प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. दगडफेकीत एकही प्रवासी जखमी झाला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस सतर्क झाले असून, तपास सुरू आहे.

जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपअधीक्षक संजय महाजन, पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर आदींनी रेल्वे पोलिस ठाण्यासह घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.

"नंदुरबार रेल्वेस्थानक येण्यापूर्वी रेल्वेची गती कमी झाल्याने दगडफेक झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यानंतर रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांनी पाहणी केली. या प्रकरणात दोन जण आढळून आले आहेत. त्यातील एक मनोरुग्ण असून, दुसरा दारूच्या नशेत दिसून आला. घटनेत कोणीही जखमी नाही. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. ज्या भागात दगडफेक झाली त्या भागात लोकवस्ती नसून काटेरी झुडपे आणि मोकळी जागा आहे. प्रवाशांनी एका कॉलनीचा उल्लेख केला ती कॉलनी नंदुरबारमध्ये नाही. मात्र पोलिसांचा तपास सुरू आहे." -श्रवण दत्त एस., पोलिस अधीक्षक, नंदुरबार

Astha Express (file photo)
Nashik Cyber Crime: सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह Tweet! नाशिक पोलिसांकडून संशयिताला मुंबईतून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.