Dhule News : लाड पागा समिती शिफारशी लागू; सफाई कामगारांना दिलाशामुळे शिवसेनेचा जल्लोष

Officials of Shiv Sena's Shinde group
Officials of Shiv Sena's Shinde group esakal
Updated on

धुळे : पाठपुराव्याअंती राज्यातील लाखापेक्षा अधिक सफाई कर्मचाऱ्यांना न्याय देत लाड पागा समितीची शिफारस लागू करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय दिला आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे यांचे

आभार मानत शिवसेनेच्या शिंदे गटाचे महानगरप्रमुख मनोज मोरे व कार्यकर्त्यांनी पेढेवाटपातून जल्लोष साजरा केला. (At the end of follow up recommendation of Lad Page Committee will be implemented justice 1 lakh sanitation workers in state dhule news)

राज्य मुस्लिम मेहतर सफाई कर्मचारी संघटनेतर्फे श्री. मोरे यांच्या नेतृत्वात सफाई कर्मचारी संघटनेचे हाशिमभाई शेख व सहकाऱ्यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले.

त्यात राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाभ देत नोकरीत सामावून घेतले पाहिजे, त्यासाठी ११ मार्च २०१६ चे शासन परिपत्रक रद्द करावे आणि सर्वच जाती-धर्मांच्या कर्मचाऱ्यांबाबत लाड पागा समितीने दिलेला अहवाल स्वीकारावा, सफाई कर्मचाऱ्यां‍वरील अन्याय दूर करावा, अशी मागणी झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या शिष्टमंडळाला दहा मिनिटे वेळ देत स्थिती समजून घेतली व सकारात्मक प्रतिसाद दिला. हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडून उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री भुसे यांच्या नेतृत्वात समितीची नेमणूक करत अहवाल सादर करण्याचे सूचित केले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Officials of Shiv Sena's Shinde group
Dhule News : मनपाच्या ‘आरोग्य’मध्ये धुसफूस! अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, जबाबदाऱ्यांतून नाराजी

समितीने सकारात्मक अहवाल देत लाड पागा समितीची शिफारस लागू करण्यास सहमती दर्शविली व तसा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (ता. २४) शासन निर्णय जाहीर केला. त्यामुळे राज्यातील एक लाखापेक्षा जास्त सफाई कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.

अशा सफाई कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झालेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आतषबाजी आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सफाई कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला.

महानगरप्रमुख मोरे, सफाई कर्मचारी संघटनेचे हाशिम मुस्ताक शेख, माजी नगरसेवक संजय वाल्हे, उपमहानगरप्रमुख समाधान शेलार, शेखर बडगुजर, सतीश वागुळे, आरिफ शेख, वसीम शेख, जलील बेग, दीपक माळी, सुनील चित्ते, भानुदास भवरे, सलमान शेख, नासिर शेख, मुक्तार शेख, जमील शेख, जाफर शेख व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Officials of Shiv Sena's Shinde group
Onion Agitation : लासलगावच्या आंदोलनाची अखेर दखल; पालकमंत्री दाखल, कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.