Dhule Crime News : माजी उपमहापौरांसह दोघींवर हल्ला

हर हर महादेव व्यायाम शाळेत गर्दी का करत आहे असे विचारल्याच्या रागातून दहा जणांनी कोयते, काठ्यांनी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह इतरांवर हल्ला चढवित त्यांच्या गळ्यातील सोनपोत खेचून घेतली.
Attack on two including ex-mayor dhule crime news
Attack on two including ex-mayor dhule crime news esakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील चाळीसगाव रोडवरील हर हर महादेव व्यायाम शाळेत गर्दी का करत आहे असे विचारल्याच्या रागातून दहा जणांनी कोयते, काठ्यांनी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह इतरांवर हल्ला चढवित त्यांच्या गळ्यातील सोनपोत खेचून घेतली.

तसेच चारचाकीसह दुचाकीचीही तोडफोड केली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Attack on two including ex-mayor dhule crime news)

याबाबत माजी उपमहापौर श्रीमती अंपळकर (वय-४८, रा. मारोती नगर, चाळीसगाव रोड, धुळे) यांनी चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, १० जानेवारीला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास परशुराम परदेशी, छोटीबाई परदेशी.

भूमी परदेशी, कुणाल परदेशी, उदय परदेशी, रोहित थोरात, बॉबी खैरनार, आबा, संजय, दिनेश रिक्षावाला अशा दहा जणांनी कल्याणी अंपळकर व सुलोचना राजपूत यांना अडविले. त्यानंतर छोटीबाई व तिची मुलगी भूमी यांनी शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण केली.

Attack on two including ex-mayor dhule crime news
Dhule Fake Doctors : बोगस डॉक्टरला 2 वर्षे कारावास

तसेच अंपळकर यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनपोत झटापटीत खेचून घेतली. तर इतरांनी कोयते, लाठ्या-काठ्या घेऊन परिसरात दहशत माजवून अंपळरकर यांच्या घरासमोर अंगणात लावलेली कार व सुलोचना राजपूत यांच्या अंगणातील दुचाकीचे नुकसान केले. तसेच ऋतिक यास सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ केली.

याप्रकरणी दहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार या प्रकरणी तपास करत आहेत.

Attack on two including ex-mayor dhule crime news
Dhule Crime News : ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.