Dhule Marathon 2024 : येथील पोलिस ग्राउंडवरून ४ फेब्रुवारीला रविवारी पहाटे साडेपाचपासून धुळे मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात होईल. त्यासाठी याच ग्राउंडवर २ आणि ३ फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत सशुल्क नोंदणीधारकांना टी-शर्टचे वाटप होणार आहे. टायमिंग बीब दिले जाणार आहे.
स्पर्धेत उच्च माध्यमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अधिकाधिक संख्येने सहभागी करून घ्यावे आणि शालेय विद्यार्थ्यांना निर्धारित चिअर-अप पॉइंटवर उपस्थित ठेवावे, अशी अपेक्षा जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केली. (Attend school students at designated cheer up points for marathon dhule news)
पोलिस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात धुळे मॅरेथॉन-२०२४ च्या (सीझन-२) नियोजनांतर्गत बैठक झाली. श्री. धिवरे अध्यक्षस्थानी होते.
एक्झिक्युटिव्ह वर्किंग कमिटीचे सदस्य अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, पोलिस उपअधीक्षक तथा सायबर सेलचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील.
‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, अशासकीय सदस्य आशिष अजमेरा, आशिष पटवारी, दीपक अहिरे, डॉ. राहुल बच्छाव, संग्राम लिमये, निखिल सूर्यवंशी, तसेच उपशिक्षणाधिकारी सुधाकर बागूल, सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा स्पर्धेचे समन्वयक पंडित सोनवणे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस अधिकारी भूषण कोते आदी उपस्थित होते.
विविध सूचना
बैठकीत श्री. काळे यांनी उपस्थित शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधींना मॅरेथॉन स्पर्धेचे स्वरूप विशद केले. त्यात विद्यार्थ्यांचा अपेक्षित सहभाग, तसेच चिअर-अप पॉइंटचे नियोजन व विद्यार्थी, शिक्षकांकडून अपेक्षित नियोजन आदींबाबत विविध सूचना दिल्या गेल्या.
पोलिस ग्राउंड, बारापत्थर चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तेथून आग्रा रोड, फुलवाला चौक, गांधी पुतळा, दत्तमंदिर चौक, तेथून जिल्हा क्रीडासंकुल, वलवाडी, गोंदूर रोडमार्गे या गाव परिसरात व तेथून पुन्हा परतीने पोलिस ग्राउंडवर असा स्पर्धेचा मार्ग आहे.
त्यात ठिकठिकाणी सेवाभावी व्यक्ती, संस्था, संघटनांकडून स्पर्धकांसाठी पाणी, एनर्जी ड्रिंकची उपलब्धता होईल. विद्यार्थी चिअर-अप करतील. या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. स्पर्धेसाठी शुक्रवारी (ता. २६) मध्यरात्रीपर्यंत नोंदणी करता येऊ शकेल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि मीडिया पार्टनर ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या साथीने यंदा ही स्पर्धा होत आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
निरामय आयुष्यासाठी धावा ः धिवरे
‘फिट धुळे, हिट धुळे’ हे मॅरेथॉनचे घोषवाक्य, तर धावपटू ‘रन फॉर पांझरा’ ही थीम साकारण्यासाठी धावतील. मॅरेथॉनच्या माध्यमातून पांझरा नदीच्या स्वच्छतेसह बंधारे साकारून सौंदर्यकीकरण खुलावे, असा जनसंदेशात्मक प्रयत्न असेल. धुळेकरांची धुळ्यासाठी असलेली मॅरेथॉन स्पर्धा २०२४ ही निरामय आयुष्यासाठी आहे.
सामाजिक बांधिलकीतून आयोजक पुढाकार घेत आहेत. अनेक दानशूर धुळेकरांच्या आरोग्यहितासाठी सरसावले आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अधिकाधिक धुळेकरांनी नोंदणी करीत धावावे, अशी अपेक्षा श्री. धिवरे यांनी व्यक्त केली..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.