Dhule News : येथील जिल्हा परिषदेच्या अपहारकांड प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ, मंगला वाघ यांच्या अपसंपदेतील ५२ लाख १०७ रुपये किमतीच्या दागदागिन्यांचा मंगळवारी (ता. १०) सकाळी अकराला जिल्हा न्यायालयाच्या आवारात लिलाव होणार आहे.
या प्रक्रियेत दागदागिने घेणाऱ्याने ते पुन्हा श्री एकवीरादेवीला पुन्हा दान करावेत, असा न्यायालयाचा आदेश आहे.( Auction of Shri Ekvira Devi jewellery tomorrow at dhule district court dhule news)
या प्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. एस. बी. देवकर यांनी सांगितले, की भास्कर वाघचे जिल्हा परिषदेतील अपहारकांड उघडकीस येण्यापूर्वी १९८९ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही तक्रारींवरून आरोपी भास्कर वाघ याच्या निवासस्थानावर छापा टाकला होता.
तक्रारीनुसार त्याचे उत्पन्न किती आणि खर्च किती याचा हिशेब मागण्यात आला होता. अशा अपसंपदेबाबत तक्रारीमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी वाघ याच्या निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यात दागदागिने सापडले होते. या तपासात आरोपी वाघ याने पोलिसांनी जप्त केलेले दागिने श्री एकवीरादेवीचे आहेत, अशी माहिती दिली होती.
त्याप्रमाणे पोलिस दप्तरी नोंद झाली. विभागाच्या संपूर्ण तपासानंतर न्यायालयात आरोपी वाघ याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले. तपासात उत्पन्नापेक्षा ११ लाखांची जास्त अपसंपदा आरोपी वाघ याच्याकडे आढळली होती.
या प्रकरणी १९९६ च्या सुमारास खटला चालला. कामकाजानंतर न्यायालयाने आरोपी भास्कर वाघ यास तीन वर्षांची, तर पत्नी मंगला वाघ हिला दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. या निकालाविरोधात या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानंतर उच्च न्यायालयानेही जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
या निकालाविरोधात आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, निकालाचा कल जिल्हा न्यायालयाच्या बाजूनेच राहिला. त्यानुसार पोलिसांनी जप्त केलेले दागिने श्री एकवीरादेवीला देण्यात यावेत व त्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात यावी आणि जो कोणी बोली बोलेल त्याने लिलावातील दागदागिने पुन्हा श्री एकवीरादेवीला परत द्यावेत, असा निकाल दिला गेला.
त्यानंतर २००७ पासून यथोचित प्रक्रिया पार पाडली गेल्यानंतर मंगळवारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात सकाळी अकराला लिलाव केला जाणार आहे. लिलावात दागिने घेणाऱ्यांनी हे दागिने परत श्री एकवीरादेवी पुन्हा दान करावेत, असा न्यायालयाचा आदेश असल्याने योग्य प्रक्रिया पार पाडली जाईल, असे ॲड. देवकर यांनी सांगितले.
या प्रकरणी ज्या वेळी तपास केला गेला तेव्हा आरोपी भास्कर वाघ याने अपसंपदेतील दागदागिने हे श्री एकवीरादेवीचे असल्याची माहिती दिली होती. त्यामुळेच हे दागिने पुन्हा देवीला दान करण्यात येणार आहेत. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी मंगला वाघ यांचे निधन झाले
५२ लाखांचे दागदागिने
लिलावात पदक असलेला सोन्याचे हार, चांदीचे बाजूबंद आदी दागदागिन्यांचा समावेश आहे. लिलावात एकूण सुमारे १२७६.६४ ग्रॅम वजनाच्या व ५२ लाख १०७ रुपये किमतीच्या दागदागिन्यांचा लिलाव होणार असल्याची माहिती ॲड. देवकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.